24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeनांदेडकंधार व लोहा तालुका अतिवृष्टीग्रस्त जाहीर करून ओला दुष्काळ जाहीर करा

कंधार व लोहा तालुका अतिवृष्टीग्रस्त जाहीर करून ओला दुष्काळ जाहीर करा

एकमत ऑनलाईन

कंधार (प्रतिनिधी): कंधार व लोहा तालुका अतिवृष्टीग्रस्त जाहीर करून ओला दुष्काळ जाहीर करावे या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय कंधार निवेदन देण्यात आले.

शेतकऱ्यांवर कोरोना 19 संकट काळात त्यामुळे खरीप हंगामात आव ते सवा भावाणे खत व बियाणे खरेदी करावे लागले त्यात सोयाबीनचे बोगस बियांनाणे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असे असताना शेतकरी कर्ज काढून शेतीची पेरणी व मशागत केली त्यातच युरिया खताचा तुटवडा दाखवून दुकानदारांनी शेतकऱ्यांना लुटण्याचे काम केले इत्यादी सर्व संकटांना तोंड देवून बळीराजाने पिकाची जोपासना केली असून निसर्गाच्या अवकृपेमुळे होत्याचे नव्हते झाले आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून गेला आहे.

तरी कंधार व लोहा तालुका अतिवृष्टीग्रस्त जाहीर करून ओला दुष्काळ जाहीर करावे आणि 2019 खरीप हंगामामध्ये ठाकरे साहेब यांनी पूर्वी केलेल्या मागणीप्रमाणे एकरी 25 हजार रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, खरीप हंगाम 2020 चा विमा मंजूर करून वाटप करावा, महिंद्रा श्रीराम सारखे फायनान्स शेतकऱ्यांकडून वसुली बंद करा, शेतीची कामे रोजगार हमी मार्फत करण्याची तरतूद करावी, शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना 24 तास वीजपुरवठा करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर जाधव, गुलाबराव जाधव, संभाजी लाडेकर, शिवाजी राहेरकर, आत्माराम लाडेकर, शिवाजी भागानगरे, सतीश लुंगारे, राजेश्वर फैलवाड, रमेश डोळेवर, प्रभाकर जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

मराठा समाजाचा सरसकट इतर मागास प्रवर्गामध्ये समावेश करावा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या