25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeनांदेडरूग्णसंख्येत घट: जिल्ह्यात केवळ ५१८ नव्या बाधितांची नोंद

रूग्णसंख्येत घट: जिल्ह्यात केवळ ५१८ नव्या बाधितांची नोंद

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात रविवारी प्राप्त झालेल्या २ हजार ६६२ अहवालापैकी ५१८ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ४४४ तर अँटिजेन तपासणीद्वारे ७४ अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ८१ हजार २८४ एवढी झाली असून यातील ६९ हजार ९५४ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला ९ हजार ४६८ रुग्ण उपचार घेत असून २१४ बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे.
दिनांक १ ते २ मे या दोन दिवसांच्या कालावधीत २५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या १ हजार ५९९ एवढी झाली आहे . उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.६ टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा १२०, बिलोली २७, कंधार २१, मुदखेड १२, हिंगोली ६, आदिलाबाद १, नांदेड ग्रामीण ९, देगलूर ३३, किनवट ३५, मुखेड २७, यवतमाळ ७, बुलढाणा १, अर्धापुर १६, धर्माबाद ४०, लोहा २४, नायगाव ४, परभणी २, वाशिम १, भोकर २१, हदगाव १९, माहूर ८, उमरी ८, लातूर २ असे एकूण ४४४ बाधित आढळले. आजच्या बाधितांमध्ये अ‍ॅन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात १६, बिलोली २, हिमायतनगर २, माहूर ४, नायगाव ११, नांदेड ग्रामीण १, देगलूर २, कंधार २, मुखेड २, हिंगोली ३, अर्धापुर ६, धर्माबाद ३, किनवट ३, मुदखेड ३, नागपूर १, भोकर १, हदगाव ४, लोहा ७, उमरी १ व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे ७४ बाधित आढळले. आज जिल्ह्यातील १ हजार २०२ कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे.

यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे २०, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण ५७६, धमार्बाद तालुक्यातंर्गत २९, देगलूर कोविड रुग्णालय ५, अर्धापुर तालुक्यातंर्गत २३, उमरी तालुक्यातंर्गत ५५, मालेगाव टीसीयु कोविड रुग्णालय १, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल १०, मुखेड कोविड रुग्णालय ७, नायगाव तालुक्याअंतर्गत ४, किनवट तालुक्याअंतर्गत १३१, हिमायतनगर तालुक्याअंतर्गत २१, बिलोली तालुक्याअंतर्गत ६३, मुदखेड कोविड केअर सेंटर १५, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ३०, हदगाव कोविड रुग्णालय १२, कंधार तालुक्यातंर्गत १२, माहूर तालुक्यातंर्गत ८, लोहा तालुक्यातंर्गत ५५, खाजगी रुग्णालय १२५ बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

आज ९ हजार ४६८ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. आज रोजी सांयकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे ३०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे १६, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे ५०, भक्ती जंबो कोविड केअर सेंटर २६ खाटा उपलब्ध आहेत.

जिल्ह्यात १०० दिवसांत लसीकरण पूर्ण करावे; पालकमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या