29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeनांदेडलोहा शहरातील कोरोनाच्या रुग्णात घट ; ग्रामीण भागात शिरकाव

लोहा शहरातील कोरोनाच्या रुग्णात घट ; ग्रामीण भागात शिरकाव

एकमत ऑनलाईन

लोहा : लोहा शहरात मागील महिन्या पासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होता.पण पाच दिवसांचा शहर वासीयांना केलेला व त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या दहा दिवसाचा लॉक डाऊन झाल्यामुळे शहरातील कोरोना रुग्ण संख्येत घट आली तर ग्रामीण भागात सध्या जोरात कोरोनाचा शिरकाव सुरू आहे.

लोहा शहरात मागील महिन्याभरा पासून कोरोनामुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली अनेक चालती बोलती आणि कमी वयाची माणसं आपल्यातून निघून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजमन भयभीत झाले आहे.असा काळात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग वाढला खाजगी तीन कोविड हॉस्पिटल सह सरकारी कोविड रुग्णालयात रुग्ण संख्या मावेना काहीजण नांदेड, हैदराबाद येथर उपचारासाठी जात होते असा स्थितीत दिलासादायक चित्र गेल्या चार पाच दिवसा पासून समोर येत आहे ते म्हणजे शहरातील कोरोना रुग्णात घट झाली आहे

चाळ न मिळाल्याने तिनशे क्विंटल कांदा उघड्यावर!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या