25.4 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeनांदेडहिमायतनगर येथे सदगुरु सेवालाल महाराजांच्या झेंड्याची विटंबना

हिमायतनगर येथे सदगुरु सेवालाल महाराजांच्या झेंड्याची विटंबना

एकमत ऑनलाईन

हिमायतनगर(प्रतिनिधी) ते पार्डी रोड व सवना ते टेंभी रोड यामधील हिवाळा चौक येथे काल मध्यरात्री काही अज्ञात समाजकंटकांनी सद्गुरु सेवालाल महाराज यांच्या झेंड्याची विटंबना केली आहे, हिमायतनगर तालुक्यातील नामांकित चौक असणारा हिवाळा चौक या ठिकाणी समाजकंटकांनी हे कृत्य करून गोर बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या आहे, म्हणून गोर बंजारा समाजाच्या गोरसेना या सामाजिक संघटनेकडून हिवाळा चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बॅरिकेड लावून रस्ता रोको करून जाहीर निषेध करण्यात आला आहे

यापूर्वी ही ऑक्टोबर 2018 मध्ये ह्या ठिकाणी ह्याच ध्वजाची विटंबना झाली होती, तेव्हा बंजारा समाजाने त्यांचा विरोध केला होता, त्यावेळेस प्रशासनाने अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करून सन्मानाने झेंडा लावण्यात आला होता, आज पुन्हा तसाच प्रकार घडल्याने गोर बंजारा समाज आता गप्प बसणार नाही व येत्या दोन तारखेपासून बाराळी तांडा येथील गोर बंजारा समाजाचे असंख्य नागरिक उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले व सबंधित आरोपींना तात्काळ अटक न केल्यास व गोर सेनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातील तालुकाभर आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा सुद्धा गोरसेना या संघटनेकडून हिमायत नगर पोलिसांना देण्यात आलेला आहे.

दसऱ्यानिमित्त श्री.विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात झेंडू फुलांची आणि आपट्यांच्या पानांची आरास

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या