26.3 C
Latur
Sunday, March 26, 2023
Homeनांदेडदेगलूर खून प्रकरण; सहा जणांना आठ दिवसांची कोठडी

देगलूर खून प्रकरण; सहा जणांना आठ दिवसांची कोठडी

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रतिनिधी
मागच्या आठवड्यात एका ६० वर्षीय महिलेचा खून आणि लुट प्रकरण घडले होते. याप्रकरणी दि. २८ रोजी सकाळी पाच दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केल्यानंतर रात्री उशीरा सहाव्या दरोडेखोराला अटक केली. या सहा दरोडेखोरांना न्यायालयात हजर केले असता देगलूरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सहाही दरोडेखोरांना आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दि.२३ जानेवारी रोजी श्रीपतराव पाटील आणि चंद्रकलाबाई रात्री ९ वाजता आपल्या घराचे मुख्य गेट बंद करून घरात झोपले होते. यावेळी अचानक काही दरोडेखोर त्यांच्या घरात घूसले आणि दरोडेखोरांनी दोघांचे तोंड बांधून टाकले. चंद्रकलाबाई यांच्या गळ्यात व अंगावरील सोन्या-चांदीचे दागीने असा ३ लाख ८९ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला व चंद्रकलाबाई यांचा खून करून दरोडेखोर फरार झाले. या प्रकरणी देगलूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरिक्षक सोहन माछरे यांच्याकडे होता.

उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांच्या नेतृत्वात पोनि सोहन माछरे आणि त्यांच्या सहका-यांनी दि.२८ जानेवारी रोजी विठ्ठल व्यंकट बोईनवाड, गौतम दशरथ शिंदे, शेषराव माधवराव बोईनवाड तिघेही रा.वसुर ता. मुखेड, बालाजी पंढरी सोनकांबळे रा.मंग्याळ ता. मुखेड, आणि शहाजी श्रीराम मोरताळे रा. मोरतळवाडी ता.उदगीर या पाच जणांना अटक केली होती. तर दि. २८ जानेवारीच्या रात्री पोलिसांनी या प्रकरणातील सहावा आरोपी साईनाथ नागन्नाथ मामीलवाड रा. आंबुलगा यास अटक केली.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या