देगलूर प्रतिनिधी
वितरण कंपनीचे ढेपाळले कारभार वारंवार समोर येत आहे वीज वितरण कंपनीच्या कर्मचा-यांच्या दुर्लक्षामुळे शहरातील काही भागात वीज ही वारंवार जात असल्याने नागरिक हैराण होत आहेत. त्यामुळे कोणास तक्रार द्यावी व कोणास सांगावे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
सध्या गर्मीची व उकाड्याची दिवस असल्याने नागरिक आधीच हैराण आहेत तापमान सरासरी चाळीस च्या वर आहे त्यामुळे प्रत्येक घरामध्ये कुलर फॅन सतत चालू असल्याने विजेची मागणी सहाजिकच वाढलेली आहे परंतु येथील महावितरण कंपनीचे अधिकारी तथा कर्मचारी यांच्या ढिसाळ नियोजनामुळे येथील वीज प्रवाह वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान सदरील वीज पुरवठा खंडित राहण्याचा कालावधी हा सलग दोन ते तीन तास असल्याने दिवसा नागरिकांची लाहीलाही होत आहे तर रात्री झोपमोड होत आहे कंपनीचा वीज यंत्रणेची व्यवस्थित नियोजन नसल्याने येथील डीपी वरील क्लोज वारंवार बिघडत असल्याने शहरातील नाटकरगल्ली, होटलबेस, पेटअमरापूर गल्ली, भायगाव रोड, आंबेडकर चौक, आधी भागासह शहरातील अनेक ठिकाणी वारंवार वीज खंडित होत आहे.
शहरातील नागरिक या विजेच्या समस्येमुळे रात्री-बेरात्रीसुद्धा हैराण होत आहेत अनेकदा तक्रार निवारण केंद्रांमध्ये फोन केला तरी येथील अधिकारीकिंवा कर्मचारी तक्रार निवारण करण्यासाठी फोन सुद्धा घेत नाही त्याशिवाय त्या त्या भागातील वीज कर्मचा-यांची अधिका-यांचे मोबाईल फोन लावले असता ते सुद्धा फोन घेत नसल्याचे दिसून येते. देगलूरच्या महावितरण विभागाचे म्हणजे संबंधी नियोजन सुरू होत नसल्याने गेल्या काही दिवसापासून शेर वर्षातून या वीज वितरण विभागाविषयी रोष व्यक्त होत आहे.