हदगाव : कोरोणा विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सन २०२० ते २१ हे चालू शैक्षणिकवर्ष अद्यापही सुरु झाले नाही त्यामुळे जूलै २०२० ला इयता पहिली ते बारावीच्या निर्धारीत अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली त्याऐैवजी आता सरळ सरळ ५० टक्के कापत करावी अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे हदगाव तालूका सचिव अनिल दस्तूरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,शालेय शिक्षणमंत्री व शिक्षण राज्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात श्री.दस्तूरकर यांनी म्हटले आहे की, चालू शैक्षणिकवर्ष अद्यापही सुरु झाले नाही,याबद्दल दिवाळीनंतर निर्णय घेऊत असे शालेय शिक्षण मंत्र्यांनी माध्यमाद्वारे जाहिर केले,परंतू महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्हयात कोरोणा बाधितांची रुग्नसंख्या कमीअधिक प्रमाणात सर्वत्र वाढतच आहे,दहावी व बरावीचा अभ्यासक्रम खुप जास्त आहे.जर दिवाळीनंतर शाळा सुरु झाल्या तर उर्वरीत ७५ टक्के अभ्यासक्रम मिळणाऱ्या कार्यदिनात पुर्ण होणार नाही,शिवाय दोन्ही बोर्डाच्या परीक्षेआधी प्रात्यक्षीक परीक्षा जवळपास २० ते २२ दिवस चालतात त्यामुळे किमान या दोन वर्गाचा अभ्यासक्रम २५ टक्या ऐैवजी ५० टक्के कमी करावा जेनेकरुन विद्यार्थाना अभ्यासाचा तान येणार नाही.
ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवणीतही अनेक अडचणी येत आहेत.अनेक कुटूंबाकडे स्मार्टफोनच नाहीत तेव्हा ५० टक्के अभ्यासक्रमावरच बोर्डाच्या परीक्षा घेतल्यास विद्यार्थी उत्तीर्ण होतील त्यांच वर्ष वाया जाणार नाही,तरी हा दिलासा दायक निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.