27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeनांदेडआक्षेपार्ह पोस्टप्रकरणी कारवाईची मागणी

आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी कारवाईची मागणी

एकमत ऑनलाईन

हदगाव : छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण करून फेसबुक पोस्टच्या माध्यमातून बदनामी करणा-या विलास जोशी नावाच्या व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, हदगाव यांनी केली आहे.

याबाबत माधवराव पाटील देवसरकर यांच्या आदेशाने स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड टीम हदगावच्या वतीने हदगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. विलास जोशी याने केलेले लिखाण अत्यंत आक्षेपार्ह अहसून, त्याच्या लिखाणामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी, अशी मागणी निवदेश्नात करण्यात आली आहे. दोन दिवसात कारवाई न झाल्यास पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. निवेदन देताना संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष संदीप आढाव, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सचिन पाटील कामारीकर, तालुकाध्यक्ष गजानन पाटील सोळंके, शहराध्यक्ष आकाश गोदले, सोशल मीडिया अध्यक्ष संदीप गिरी व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या