लोहा : लोहा तालुक्यातील दापशेड येथे काल दि. १९ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी होऊन शेत पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे तर अनेक घरांमध्ये पाणी शिरून घराची ही पडझड झाली आहे तेव्हा याचे पंचनामे प्रशासनाने करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी दापशेडचे सरपंच विरभद्र राजूरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पुढे निवेदनात सरपंच विरभद्र राजुरे यांनी असे नमूद केले की, दापशेड येथे गेल्या पाच ते सात दिवसापासून परतीचा पाऊस प्रचंड प्रमाणे वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट होऊन पडत आहे यामुळे शेतकऱ्याचे उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे.
काल दि.१९ सप्टेंबर रोजी तर जणू काय ढगफुटी झाल्याप्रमाणे दापशेड शिवारात प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी होऊन होऊन अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले त्यांच्या संसारोपयोगी वस्तूचे नुकसान झाले अनेकांच्या घराची पडझड झाली आहे.
तसेच शेतामधील ज्वारी, कापूस सोयाबीन, आधी पिके आडवी झाली आहेत त्यामुळे या पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे तेव्हा महसूल प्रशासनाने व कृषी विभागाने यांचे पंचनामे तात्काळ करावे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व घराची पडझड झालेल्या नागरिकांना त्याच्या घरात पाणी गेले आहे त्याला नागरिकांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत करावी अशी मागणी सरपंच विरभद्र राजूरे यांनी केली आहे.
कुंडलवाडी नगराध्यक्ष पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर