24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeनांदेडपावसाळा पुर्व कामे तातडीने सुरू करण्याची मागणी

पावसाळा पुर्व कामे तातडीने सुरू करण्याची मागणी

एकमत ऑनलाईन

उमरी (प्रतिनिधी) : पावसाळा तोंडावर आला असताना देखील उमरी नगर परिषद प्रशासनाने अद्याप पावसाळा पुर्व कामे हाती घेतली नसल्यामुळे उमरी शहर काँग्रेस कमेटीतर्फे मुख्याधिका-यांना निवेदन देऊन पावसाळा पुर्व कामे तातडीने हाती घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात इस्लामपूरा भागातील पावसाचे पाणी गाव तलावास जाण्याचे दृष्टीने उपाय योजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. ऐन पावसात इस्लामपूरा भागात पाणी साचून गरीबांचे संसार रस्त्यावर येणार नाहीत याची न. प. प्रशासनाने दक्षता घ्यावी अशी मागणी करणात आली आहे.

उमरी शहरातील तुंबलेल्या नाल्या तात्काळ साफ करून नालीचे घाण पाणी रस्त्यावरून वाहणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरातील बंद पडलेले पथ दिवे विद्युत बिल भरणा करून तात्काळ चालू करण्याची मागणी करण्यात आली आहे. ज्यामुळे पावसाळ्यात चो-या होणार नाहीत असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शहरातील बंद पडलेले हातपंप आणि बंद पडलेल्या विद्युत मोटारी दुरुस्त करुन घेण्याची मागणी करुन पावसाळ्यात जलशुध्दीकरण केंद्रावरील पाणी फिल्टर व्यवस्था सक्षम ठेवण्याची मागणी करुन अशुध्द पाण्यामुळे जनतेचे आरोग्य बिघडणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी अशी निवेदनात शेवटी मागणी करण्यात आली आहे.

येत्या ३० मेपर्यंत न.प.प्रशासनाने कार्यवाही न केल्यास दिनांक १ जून रोजी नगर परिषद कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी, म. रफिक सजन सेठ, शहराध्यक्ष किशोर पबितवार, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष शेख शकिल छोटूमियॉं, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गजानन आडगुडवार, सय्यद यावर पाटील, राजेश वर्मा, शेख युनूस, भिमराव शितोळे, संतोष मुटकुटवार, परमेश्वर मुदीराज आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या