धर्माबाद (प्रतिनिधी) येथे गेल्या वर्षी भारतीय कापास निगम यांच्याकडून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांचा जवळपास ९४४६६. २५ किव्टल कापूस आधारभुत किंमतीत खरेदी केल्यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधव समाधान व्यक्त केले आहे.परंतु यंदा कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी सी.सी.आय.ने कुठलीच हलचाल सुरू न केल्यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधव चिंताग्रस्त असल्याचे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र पोतगंटीवार यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी धर्माबाद येथे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची लेखी मागणी भारतीय कापास निगमच्या महाप्रबंधकाकडे केली आहे.
धर्माबाद तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाताला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.व नदी,नाले व परीसरातील शेतात पाऊसाचे पाणीच पाणी साचल्यामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.तसेच तालुक्यातील असंख्य गोर गरीब जनतेच्या घरांची पडझड झाली असून घरातील संसार उपयोगी साहित्य पाण्याने वाहून गेल्यामुळे त्यांच्या परीवारावार उपवासमारीची वेळ आली असताना सन २०२०-२१या चालू वर्षात धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी केंद्र शासनाच्या सी.सी.आय.विभागाकडून कुठलीच हलचाल दिसत नसल्यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत.
जिल्ह्यातील नांदेड, नायगाव,कुंटर येथे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून सदरील कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.परंतु धर्माबाद येथे कापुस खरेदी केंद्र सुरू करण्याच्या काही हालचाली दिसत नसल्यामुळे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र पोतगंटीवार यांनी लगेच यासंदर्भात भारतीय कापास निगमच्या महाप्रबंधकाकडे धर्माबाद येथे गेल्या वर्षी प्रमाणे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची लेखी मागणी केली आहे.तसेच खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी प्रत पाठविले आहे.
सदरील मागणीची दखल खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घेतली असून चिखलीकर यांना पुन्हा कोरोनाची लागण झालेली असताना सुध्दा त्यांनी आशा परीस्थीत शेतकऱ्यांच्या हितासाठी धर्माबाद येथे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याच्या संदर्भात भारतीय कापास निगमच्या महाप्रबंधकांना भ्रमध्वनीवरून सुचना देऊन अतिवृष्टीमुळे धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांची परीस्थीत नाजूक असून शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक संकटांत सापडला आहे.त्यामुळे धर्माबाद येथे कापूस खरेदी केंद्र सुरु झालाच पाहिजे असे भारतीय कापास निगमच्या महाप्रबंधकांना खासदार चिखलीकर यांनी ठणकावून सांगितले असल्याचे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र पोतगंटीवार यांनी सांगितले आहे.
राज्यसभेत वादग्रस्त शेती विधेयकावरून जोरदार गदारोळ