16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeनांदेडनांदेड येथील जिजामाता चौकाच्या फलकाची विटंबना ; एक तास रास्ता रोको आंदोलन

नांदेड येथील जिजामाता चौकाच्या फलकाची विटंबना ; एक तास रास्ता रोको आंदोलन

आरोपीला तातकाळ अटक नाही केल्यास उद्या सोमवारी शंकरनगर येथे रास्ता रोको आनखी करनार असल्याचे रामतीर्थ पोलिसा निवेदनाद्वारे कळविले आहे. घटना स्थळी उपविभागीय अधीकारी बिलोली धूमाळ यांनी भेट देऊन आरोपील तातकाळ अटक करू असे सांगीतले

एकमत ऑनलाईन

शंकरनगर : नांदेड – देगलूर राज्य महामार्ग लगत जिजामाता चौक म्हणून फलक आहे. त्या फलकाची समाज कंटकाकडून विटंबना करण्यात आल्याने संतप्त जमावाने आरोपींना तात्काळ अटक करा म्हणून रास्ता रोको करण्याचा अचानक पवित्रा घेतला. जिजामाता चौक म्हणजे वर्दळीचे ठिकाण या ठिकाणी 19 सप्टेंबर रोजी साडेसहाच्या दरम्यान जिजामाता चौकातील जिजामाता फलकाची समाज कंटकाकडून विटंबना करण्यात आल्याचे निदर्शनास येताच येथील सकल मराठा समाज बांधवांनी शंकरनगर येथील बाजारपेठे तात्काळ बंद करण्याचे आवाहन करताच बाजारपेठ बंद करण्यात आली.

येथील जिजामाता चौकात सकल मराठा बांधव एकत्र येऊन आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावे म्हणून अचानक रास्ता रोको आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला रास्ता रोको आंदोलन एक तास चालले दरम्यान देगलूर – बिलोलीचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी समाज बांधवांना समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

बिलोलीचे पोलीस उपविभागीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आरोपीस तात्काळ अटक नाही झाल्यास 21 नोव्हेंबर रोजी शंकरनगर बंद ची हाक देण्यात आली असून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. रामतीर्थ पोलीसांनी रितसर तक्रार नोंदवून घेतल्या नंतर जमाव निवळला. शंकरनगर येथे तणावपूर्ण शांतता आहे.

यावेळी समाजातील घटक म्हणून स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील वाडेकर,छावा संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष दिगांबर पाटील देगलूरे,जगदिश पाटील वाडेकर, बालाजी पाटिल देगलूरे,राम पाटील टेकाळे,संतोष पाटील देगलुरे,दत्ताहारी पाटील रोकडे,दत्ता पाटील देगलूरे,हणमंत पाटील देगलूरे,आशोक पाटील जाधव,आनंद पाटील डाकोरे,स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे युवा तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील वन्नाळे,वैजनाथ पाटील रोकडे,गोविंद पाटील देगलुरे,साईनाथ पाटील देगलुरे शिवलिंग पाटील देगलुरे,गुनवंत पाटिल, योगेश पाटील वाडेकर,श्रिनिवास पाटील रोकडे,बालाजी पाटील जोमेगावे,बाबूराव पाटील योगे,अरूण लिंगणवार, शिवाजी पाटील लामतलवारे,बालाजी पा पिसाळे,श्रिनिवास पा रोकडे,आदि परिसरातील कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याचा प्रयत्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या