23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeनांदेडतुळशी सोसायटी निवडणुक चेअरमनपदी देशमुख

तुळशी सोसायटी निवडणुक चेअरमनपदी देशमुख

एकमत ऑनलाईन

माहुर : राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाची असलेली माहूर तालुक्यातील तुळशी येथील बहुचर्चीत असलेली विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन व उप चेअरमन पदासाठी दि. १ जुलै रोजी सेवा सहकारी सोसायटीची बिनविरोध निवड करण्यात आली, चेअरमन पदी सामाजिक कार्यकर्ते राजे अनंतराव देशमुख, तर उपचेअरमन पदी देवसिंग धर्मा जाधव, यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

तर संचालक मंडळात तीन्नू पवार, शिवराम जाधव, खुशाल जाधव,नामदेव मांडाळे, मनोहर शिडाम, माणिक सलाम, श्रीमती डॉ, उषाताई पंजाबराव देशमुख, सुमनबाई राठोड, देवजी आत्राम, दशरथ राठोड, मनोज पाटील कन्नलवार,यांची निवड करण्यात आली.

या निवडणूक प्रक्रियेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून सोसायटीचे अधिकारी शंकर बामणे व सचिव एस बी वांगे यांनी निवडणुकीचे काम पाहिले, सोसायटीच्या चेअरमन व उप चेअरमन पदासाठी झालेल्या बिनविरोध निवडणुकीचे श्रेय निवडून आलेल्या पदाधिका-्यांनी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व संचालकांना दिले आहे,यावेळी माजी चेअरमन मोतीराम मंडाळे, सरपंच देवीदास मारुती मडावी , सीताराम सलाम विजय राठोड, दीपक बर्डे, आदी मान्यवर उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या