34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeनांदेडशहरातील विकास कामे ठप्प,स्वच्छतेचा उडाला बोजवारा

शहरातील विकास कामे ठप्प,स्वच्छतेचा उडाला बोजवारा

एकमत ऑनलाईन

बिलोली : बिलोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष हे दोन्ही पद प्रभारी असून प्रभारीराज कुचकामी ठरत आहे.परिणामी शहरातील विकास कामे ठप्प झाली असून स्वच्छतेचाही बोजवारा उडाला आहे. बिलोली नगर परिषदेच्या अध्यक्षा मैथिली संतोष कुलकर्णी नगरविकासाचा कामात निष्क्रिय ठरल्या असल्याने विविध कारणास्तव पक्ष श्रेष्टीनी वैयक्तीक रजेवर पाठवल्याची चर्चा शहरभर आहे. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दि.६ नोव्होबर रोजी नगर परिषदेच्या सूत्र उपनगराध्यक्ष मारोती पटाईत यांचा हाती सोपविली.मागील चार वर्षांपूर्वी बिलोलीचा जनतेने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांचावर विश्वास ठेवून १७ पैकी जनतेने काँग्रेस पक्षाचे १२ नगरसेवकांना निवडुन स्पष्ठ बहुमत दिले व नगराध्यक्ष पदी मैथिली संतोष कुलकर्णी यांना जनतेने प्रचंड मतांनी जनतेतुन निवडुन येण्याचा बहुमान मिळाला.

मात्र सदा चर्चत राहणा-या नगराध्यक्षा कुलकर्णी यांनी आंबेडकर नगर व साठे नगर मधील पंतप्रधान आवास व रमाई घरकुल योजना राबविण्यात कुचराई केली व सौर ऊर्जा योजना राबविण्या बाबत नगर सेवकांना विश्वासात न घेता जाहीर प्रकटन काढण्यात आल्याने नगर सेवक व अध्यक्ष यांच्यात मतभेद निर्माण झाले. अशा अनेक अडचणी सोडविण्यात असमर्थ ठरल्याने त्यांचा विरोधात जनतेसह नगरसेवकांनी अविश्वास दाखल करण्याची हालचाली सुरु झाल्याची भमक लागताच नगराध्यक्षा कुलकर्णी पक्ष श्रेष्टीनी दिर्घ रजेवर जाण्याचा सक्तीचा सल्ला दिला. नगराध्यक्षचे माळ मारोती पटाईत यांचा गळ्यात पडली चेहरा बदलल्यास सर्व सुरळीत होईल असे वाटत असतानाच स्वपक्षियांच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष पटाईत यांच्यावर विविध आरोप करत नगर परिषेदेची सर्व साधारण सभा बैठक रद्ध करावी लागली.

शहरवासी आपल्या पाठीशी राहतील म्हणून प्रभारी नगराध्यक्ष पटाईत यांनी सुरवातीलाच शहरातील हाडाचे कारखाने बंद करणे व शहरातील मुख्य रोडवरील देशी दारूचा दुकानासाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर नाटकीय उपोषणाला बसले होते.त्यात काय साध्य केले हे जनतेला कळण्याच्या आतच तो ही विषय सोडुन दिला.यात आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा ही शहरवासियात मोठ्या जामाने चालु आहे.जनतेचे प्रतिनिधी जर उपोषणास बसले तर सर्वसामान्य नागरिकांना आपल्या मागण्या साठी कुठ जावे असा प्रश्न नागरिकांना पडला होता. बिलोली शहरातील काही प्रभागात घनकचरा व्यवस्थापकाकडून नाली व कचरा साफ सफाई केली जात नाही तर काही प्रभागात कचरे व भरलेल्या नालीमुळे शहर बेसुर व अस्वच्छ बनले आहे या ठेकेदारावर ही महीण्या काठी लाखोची उधळन होत असुन त्यास काही बोलण्याची हिम्मत पदाधिका-यात राहीले नाही तो ही लाखोचा मलिदा वाटप करुन पदाधिका-यावर मेहरबान होत असतो.

याला जबाबदार कोण ज्यांना जनतेने पाच वर्षांसाठी निवडून दिले ते दीर्घ रजेवर आहे तर प्रभारी हे बिनकारभारी बनले आहेत अशी चर्चा शहरवासीयात होत आहे.बिलोली नगर परिषदेला कायम स्वरूपी मुख्याधिकारी भेटत नाही नगरपरिषदेवर काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता असून राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेत आहे.पालकमंत्री जिल्याचे काँग्रेस नेते आहेत एवढे असतानाही शहराचा विकास होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

मनपाची थकबाकी वसूली मोहीम तीव्र

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या