धमार्बाद : धमार्बाद तालुक्यात खुलेआम मटका खेळ व आँनलाईन लाँटरी व गुटखा सुरू असुन संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा .अन्न व औषधी प्रशासनाच्या आर्शिवार्दाने गुटखा तस्करांवर कारवाई करण्याची धमक दाखवत नसल्याचे आरोप नागरिकांतून केला जात आहे. यापेक्षा गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्र शासनाची या गुटका विक्रीस बंदी असतानाही अनेक पानटपरीवर छोट्या मोठ्या दुकानातून या गुटख्याची विक्री मटका व आँनलाईन लाँटरी सुरूच असल्याचे पहावयास मिळते. त्यामुळे शाळकरी मुले व महाविद्यालयीन तरुण यातुन व्यसनाधीन होत चालल्याचे दिसून येत आहे .तेलगंणा या राज्याच्या सिमा लागुन असल्यामुळे धमार्बाद तालुक्यात गल्लोगल्लीत मटका व आँनलाईन लाँटरी चालतो व अवैध गुटख्याची विक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
राज्यात गुटखा बंदी आसताना पोलीस व धमार्बाद पोलीस व अन्न औषधी यांच्या कृपा आर्शिवार्दाने हा गोरख धंदा सुरु असल्याचे दिसत आहे. छोटे छोटे व्यसायीक सायकलवर मोटारसायकलवर प्रत्येक दुकान पानटपरीवर पुरवठा करतात तसेच शहरात गुटख्यांचे मोठे साठेबाज व्यापारीहि असुन ते गुटख्याचीही साठेबाजी करुन पानटपरी धारकांना गुटख्याचा पुरवठा करतात. या कडे मात्र पोलिस व अन्न औषध प्रशासनाचे व स्थानिक पोलीसा चे अर्थोअर्थी दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शहरात मटका व आँनलाईन लाँटरी खेळ व गुटखा विक्री चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
शहरात मटका व आँनलाईन लाँटरी खेळला जातो व गुटका बंदीच्या नावाखाली खुलेआम गुटका महागडा विकला जाऊन सर्वाच्या हप्त्याची सोय केली जात असल्याचे जाणकारांचे मत आहे. दोन रुपयाची पुडी पाच रुपयाला तर दहा रुपयाची पुडी विस रु विकुन स्वताची तुमडी भरुन पुढची पिढी बरबाद करण्याचा प्रकार शहरात घडत असल्याचे दिसत आहे. उंचे लोग उंची पसंत आसनांरी दहा रुपयांची पुडी २० ते ३० रुपयांला विक्री.होत आहे.तालुक्यात मटका व आँनलाईन लाँटरी खेळ चालतो व अवैध गुटखा विक्रीची उलाढाल दिवसाला लाखोंच्या जास्त असल्याचे सांगण्यात येते .तालुक्यात अनेक ठिकाणी गुटखा व तंबाखूजन्यपदार्थ खुले आम सुरु आहे.मात्र कोणतीही शासकीय यंत्रणा गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे.शासनाने गुटखा विक्री वर बंदी घातली असली तरी या बंदीच्या आदेशाची पायमल्ली करत तालुक्यात मुक्तपणे गुटखा विक्री व तस्करी होताना दिसून येते.तालुक्यात ग्रामीण भागात राज्य माहामार्गाच्या बाजुला पाणटप-या व धाब्यावर मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचा प्रतिबंधीत गुटखा विकला जात आहे.आँनलाईन लाँटरी व मटका खेळला जात आहे
तालुक्यातील पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखा अन्न व औषध प्रशासनाची मेहरनजर या मटका खेळी व गुटखा विक्रेत्यांवर असल्याने बेकायदा विक्री फोफावत चालली आहे. गुटखा बंदीचा कायदा करुन सरकारने गुटखा विक्री तसेच उत्पादन व वाहतुकीवर निर्बंध लादले आहे. बेकायदा व मोडत तो पध्दतशीरपणे वाकविण्याची कला असलेल्या महाभागांची सुपारी व तंबाखू अशा दोन पुड्या तयार करून या पासून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला.सरकारने तोही हानुन पाडत अशा प्रकारे उत्पादनावर कार्यवाही चे आदेश दिले.मात्र हे आदेश झुगारून लावत अर्थपूर्ण संबंध गुटखा तस्करांनी तयार करत अशा उत्पादनांची विक्री सुरुच ठेवली आहे. शासनाने जनहितार्थ मटका व आँनलाईन लाँटरी खेळ व गुटका बंदी तर केली पण काहि भ्रष्ट अधिका-यांच्या स्वताच्या आर्थीक फायद्यासाठी शासनाला असहकार्या करत असल्यामुळे गुटकाबंदिचा फज्जा उडाला आहे. म्हणुन शासनाने पुर्ण पणे गुटका बंदी कशी होईल या कडे गांभियार्ने लक्ष दिले पाहिजे असे जाणकाराचे मत आहे. तालुक्यात मटका व आँनलाईन लाँटरी खेळून अनेकाचे घरे उध्वस्त होत आहेत हरातील राहेर नाका.स्टेशन परिसरात. आंध्रा बसस्टाँड .बाळापूर. रत्नाळी.शंकर गंज.देवी गल्ली. राम नगर चौरस्ता.चिकन दुकान परिसरात जोमदार चालू असून वरिष्ठांनी लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी अशि मागणी होत आहे
जिल्ह्यातील शाळा पहिल्याच दिवशी गजबजल्या