32.6 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeनांदेडहदगाव तालुक्यात धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा

हदगाव तालुक्यात धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा

एकमत ऑनलाईन

हदगाव : १४ ऑक्टोबर १९५६ साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे पाच लाख अनुयायी सोबत हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्म स्वीकारला या ऐतिहासिक क्षणाला आज ६४ वर्षे पूर्ण झालेे तेव्हा पासुन हा दिन म्हणजे धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यांचाच एक भाग म्हणून हदगाव तालुक्यात शहरात व ग्रामीण भागात धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला.

नागसेन नगर येथे रक्तदान शिबिर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप आशा सामाजिक उपक्रमाने ६४ वा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला तालुक्यात हरडफ .वडगाव. डोरली .उमरी . कोथळा. वाटेगाव. बाभळी. ल्याहरी. हडसनी .अनेक गावात आज धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक तालुक्यात कुठेही काढण्यात आली नाही सर्वांनी सामाजिक अंतर ठेवून धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा केला

कोरोनारूपी रावणाचा नाश करू या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या