30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeनांदेडआरक्षणासाठी हदगाव मध्ये धनगर समाजाचे ढोल बजाओ आंदोलन

आरक्षणासाठी हदगाव मध्ये धनगर समाजाचे ढोल बजाओ आंदोलन

एकमत ऑनलाईन

हदगाव (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करावे ,धनगर समाजाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण दिले फक्ती अंमलबजावणी करून तात्काळ अनुसूचित जातीच्या सवलती लागू करावे यासाठी धनगर समाज वेळोवेळी रस्त्यावर आलेला आहे, न्यायालयात गेलेला आहे परंतु प्रत्येक सत्ताधारी हा धनगर जमातीच्या मागण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून झोपेचे सोंग घेत आहे आणि या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी सकल धनगर समाज तालुका हदगाव च्या वतीने दि 25 सप्टेंबर 2020 रोजी तहसील कार्यालय हदगाव येथे ढोल बजावे आंदोलन करण्यात आले आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये धनगर जमातीतील अनुसूचित जातीच्या 36 व्या क्रमांकावर अनुसूचित जातीचे आरक्षण लागू असताना शासन दरबारी अंमलबजावणी करून धनगर समाजाला न्याय दिला जात नाही ,यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा एकप्रकारे प्रत्यक्षात त्याची पायमल्ली करून घटनेचा अपमान करत आहे असेच शासनाचे धोरण असेल तर आम्ही धनगर समाज कदापिही शांत बसणार नाही, याची जाणीव ठेवा समाज अनेक वर्षांपासून शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय सुविधांपासून कोसो दूर गेलेला आहे समाजाच्या अनेक पिढ्या बरबाद झाल्या असून प्रत्येक सत्ताधारी हे समाजाच्या मागणीकडे कानाडोळा करीत आहेत.

मेंढपाळ जंगल आरक्षित, करणे,त्यावरील होणारे हल्ले पाहता बंदूक परवाना मिळणे आवश्यक आहे, त्याच बरोबर दहा हजार घरकुल मान्यता देण्यात यावी,हजार कोटी रुपये चा निधी उपलब्ध करून देणे,अनुसूचित जाती जमातीच्या सवलती देऊन आरक्षणाचा तिढा सोडवून लाभ द्यावा,असे विविध प्रकारच्या मागण्याचे निवेदन दिले आहे या वेळी तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते यावेळी डॉ भगवान निळे, ओमकार हंडेवार, श्रीनिवास हुलकाने, दिगंबर साखरे, गजानन सुकापुरे, मारुती हुलकाणे, बाबुराव हराळे, प्रभाकर डुरके, गोविंद मिजगर, ओमकार मुलगीर, आकाश लकडे, प्रशांत खंदारे, लक्ष्मण शिरगिरे, अरविंद हुलकाणे, प्रसाद कांडले, सचिन बीटेवार, महादेव नरोटे, विठ्ठल मस्के, गजानन जायनुरे, अनिल पूर्णे, किशन साखरे, प्रशांत विर, पांडुरंग कोळेकर, प्रभाकर दहिभाते, आनंद मस्के, ओमप्रकाश लकडे, उत्तम हातमोडे, संदेश निळे, लक्ष्मण भुसनर, साईराज साखरे, सदाशिव साखरे, बालाजी साखरे, अदी समाज बांधव उपस्थित होते

पंढरपुरात धनगर समाजाचे ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या