23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeनांदेडंधर्माबाद : १५५ ग्रा.पं. सदस्यांचे पद धोक्यात

ंधर्माबाद : १५५ ग्रा.पं. सदस्यांचे पद धोक्यात

एकमत ऑनलाईन

धर्माबाद : प्रतिनिधी
वर्षभरापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षीत जागेवर निवडून आलेल्या सदस्यांना निवडणुक आयोगाने दिलेल्या मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. परंतू धर्माबाद तालुक्यातील १५५ ग्रामपचांयत सदस्यांकडून अजूनही जातवैधता प्रमाणपत्र प्रशासनाकडे सादर करण्यात आले नाही. यामुळे या सदस्यांचे पद धोक्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणात पहिली सुनावणी दि.२८ एप्रिल २२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.

धर्माबाद तालुक्यात सन २०२०-२०२१ मध्ये चाळीस ग्रामपंचांयतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे या निवडणुकीत आरक्षीत जागेवर जे सदस्य विजयी झालेत अशा ग्रा.प.सदस्यांनीं दि.२१ जानेवारी २०२१ पासून दि.१७ जानेवारी २०२२ पर्यंत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते.परंतू हा आदेश दिल्यानंतरही जात वैधता प्रमाणपत्र १५५ सदस्यांनी सादर केले नाही. यामुळे प्रमाणपत्र सादर करण्यास टाळाटाळ करणा-या धमार्बाद तालुक्यातील ४० ग्रामपचांयतील १५५ सदस्याचे पद धोक्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली अांहे.या सदस्यात सरपंच,उपसरपंच पद सध्या भोगत असुन त्यांचही पद धोक्यात येणार आहे.

याबाबतचा अहवाल धमार्बाद तहसीलमधील निवडणूक विभागाकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे दि.२२ मार्च रोजी पाठविण्यात आला आहे. मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही असा १५५ सदस्यांची पहिली सुनावणी दि.२८ एप्रिल २२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. या प्रकरणात एकुण तीन सुनावणी होणार असुन याही सुनावणीत खुलासा सादर न केल्यास असा सदस्यांना अपात्र ठरविले जाणार आहे. यामुळे जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास टाळाटाळ करणा-या सदस्यांत खळबळ उडाली आहे.

धमार्बाद तालुक्यातील मुदतीच्या आत जात वैधता सादर न केलेले ग्रामपंचायतमधील सदस्य संख्या पुढील प्रमाणे आहे.यात धानोरा येथे -५ सदस्य, पाटोदा (थ)- १,राजापुर – १,समराळा-६,चिकना- ४, करखेली- ६,मनुर-४,कारेगाव- २, बेलगुजरी/हारेगाव-५, चोळाखा-२, चोडी- ३, सिरसखोड- ३, नायगाव(ध)- ४, पांगरी- ६, बन्नाळी-१, बेल्लुर(बु)- ४, बाभळी(ध)- ५,पिंपळगाव- ६,चिंचोली- ४, आतकुर-६, पाटोदा(बु)- २, विळेगाव(ध)- ५, आल्लुर/नेरळी- ६, बेल्लुर(खु)- ३, जुन्नी- ३, येवती-४, माष्टी- ३, विळेगाव(थ)-३, पाटोदा(बु)- ३, शेळगाव(ध)- ६, दिग्रस- ३, बामणी- २, मोकली/कहाळ- ३, सालेगाव-४, येताळा- ४,सायखेड- ४,बाचेगाव- ४, संगम- ६, तर जारिकोट ग्रामपंचायच्या ४ सदस्यांचा समावेश आहे.c

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या