17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeनांदेडधर्माबाद किराणा असोसिएशन तर्फे धर्माबाद कोरोना सेंटरला मदत

धर्माबाद किराणा असोसिएशन तर्फे धर्माबाद कोरोना सेंटरला मदत

एकमत ऑनलाईन

धर्माबाद (प्रतिनिधी) : धर्माबाद किराणा असोसिएशन व्यापारी वर्गातर्फे सर्व किराणा व्यापारी यांच्या कडून शासकीय कोविड सेंटर धर्माबाद येथे कोरोणा ग्रस्त लोकांच्या उपचारासाठी औषधांची मदत देण्यात आली. डॉ. लक्ष्मीनारायण केशटवार यांना संपर्क करून कोविड सेंटर ला लागणारी औषधि विचारपूस करून 100 बॉटल खोकल्याची सिरप,ग्लोव्हज, vitamin C, zink tablet, multivitamin च्या गोळ्या असे औषधि कोरोणा ग्रस्त पेशंट साठी देण्यात आली.

धर्माबाद कोविड सेंटर येथे डॉ. ईकबाल शेख,सर डॉ.पंडित सर,डॉ.लक्ष्मीनारायण केशटवार सर व अन्य डॉक्टर्स ,नर्स यांचे रुग्णांच्या उपचारावर विशेष लक्ष असते. धर्माबाद covid सेंटर येथे आत्तापर्यंत 400 च्या वर कोरोणा पेशंट दुरुस्त झाले व धर्माबाद सेंटर येथे कोरोणा ग्रस्त पेशंट ला खूप चांगला उपचार व वैयक्तिक लक्ष कोविड सेंटर येथे कार्यरत असलेले डॉक्टर्स व नर्स व तेथील स्टाफ देत आहेत. या गोष्टी चे गांभीर्य लक्षात घेऊन किराणा असोसिएशन तर्फे ओषधि देण्यात आली.

तसेच नांदेड येथे साईप्रसाद परिवार अण्णछत्र जे दवाखान्यातील रुग्णांसाठी भोजन,फळे ,व पौष्टिक आहार विनामूल्य सेवा देते त्यासाठी पंधरा हजार रुपये किराणा असोसिएशन तर्फे देण्यात आले. सर्व किराणा दुकानदार यांनी कोरोणा च्या संकटात कोरोणा ग्रस्तांसाठी अन्नदान व ओषधि साठी केलेली मदत हि वंदनीय आहे.

आमच्या संयमाचा अंत पाहू नका-सकल मराठा समाज

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या