22.6 C
Latur
Monday, January 18, 2021
Home नांदेड लोहा येथे सकल धनगर समाजाच्या वतीने ढोल बजाओ आंदोलन

लोहा येथे सकल धनगर समाजाच्या वतीने ढोल बजाओ आंदोलन

एकमत ऑनलाईन

लोहा (युनूस शेख) : लोहा तालुक्यातील धनगर समाज बांधवांच्या वतीने दिनांक 29 सप्टेंबर रोजी लोहा तहसील कार्यालयावर धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ढोल बजाओ आंदोलन करून मोर्चा काढण्यात आला,व तात्काळ अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यासह विविध मागण्याचे निवेदन सकल धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन दिले.

धनगर समाजाला घटनेने बहाल केलेले अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी धनगर समाजाच्या वतीने गेल्या 50 वर्षांपासून संघर्ष केला जात असून महाराष्ट्रातील सर्व सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले परंतु सर्वांनी धनगर समाजाच्या तोंडाला नुकतीच पाने पुसण्याचे काम केले आहे, ते आज पर्यंत धनगर समाजाने आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सहनशील मार्गाने आंदोलन केले परंतु विद्यमान सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या साक्षीने धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली जाईल असेही म्हटले होते परंतु या सरकारने आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही त्यामुळे या सरकारला धनगर समाजाच्या वतीने येत्या आठ दिवसात धनगर समाजाला मिळालेल्या आरक्षणाबाबत तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा धनगर समाज बांधव मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करतील असा इशारा लोहा तालुक्यातील सकल धनगर समाजाने दिला.

आज लोहा तहसील येथे दिलेल्या निवेदनात काही मागणी सादर केल्या आहेत त्यामध्ये प्रथम धनगर समाजाचा अनुसूचित जातीच्या आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी, महाराष्ट्रातील धनगर समाज देशाच्या राज्यघटनेत अनुसूचित जातीमध्ये (क्रमांक 36) समाविष्ट आहे परंतु केवळ शब्द शब्दामुळे धनगड आणि धनगर असा ड व रु बाबत चुकीच्या भूमिकेमुळे धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून 70 वर्षांपासून वंचित आहे.

महाराष्ट्र शासनाने उच्च न्यायालयात महाराष्ट्रात धनगड जमाती अस्तित्वात नाही असे सादर केले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित जातीतील असल्याचे समाविष्ट झाले आहे तरी सकल धनगर समाजाचा अनुसूचित जातीत शासकीय पातळीवर समावेश करून पुढील निर्देश मागण्या तातडीने मंजूर करण्यात यावे अन्यथा सकल धनगर समाज मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आमरण उपोषण करतील असा इशारा दिला आहे.

निजामपुर चा शेतकरी तिहेरी संकटात असताना प्रशासनाची बघ्याची भुमिका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या