28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeनांदेडतामसा येथे नेताजी पालकर यांच्या समाधीस्थळाचा अनादर

तामसा येथे नेताजी पालकर यांच्या समाधीस्थळाचा अनादर

एकमत ऑनलाईन

तामसा : तामसा येथील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांना हेरिटेज वॉकच्या नावाने शुक्रवारी ता. १६ सकाळी पाच किलोमीटरची पायपीट करावी लागली असून हदगाव व तामसा येथील विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, राजकारणी, मुख्याध्यापक, शिक्षक, शासकीय कर्मचारी यांनी हेरिटेज वॉकच्या निमित्ताने नेताजी पालकर यांच्या समाधीचा अनादर केल्याची चर्चा वाढत आहे.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी येथील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांना येथील नेताजी पालकर यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन अभिवादन करण्याच्या हेतूने हेरिटेज वॉक उपक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी वरिष्ठांचे आदेश असल्याचे सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांची माध्यमिक विद्यालयापासून जुने शहरातून फेरी काढण्यात आली. फेरीतील शेकडो विद्यार्ठी नेताजी पालकर यांचे समाधीस्थळ बघण्याची उत्सुक होते. पण नदीपात्रात पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने पैलतीरी जाणे शक्य नसतानाही विद्यार्थ्यांना समाधीस्थळासाठी हेरिटेज वॉकमध्ये सहभागी केले होते. समाधीस्थळी जाणार नाही, हे स्पष्ट झाल्याने विद्यार्थी नाराज होऊन शाळेच्या सूचनेप्रमाणे घरी परतले. यामुळे हेरिटेज वॉकच्या नावे झालेली पायपीट अनेकांना त्रासदायक ठरली.

यावेळी मान्यवरांनी नदीपात्रातून जात समाधीस्थळ गाठले, पण त्या ठिकाणी अभिवादन करताना आपण समाधीस्थळावर चढून उभे टाकलो, याचे भान संबंधितांना नव्हते. नेताजी पालकर यांची प्रतिमा समाधीस्थळाच्या मध्यभागी ठेवून अभिवादन करताना मोठ्या प्रमाणात फोटोसेशन झाले.

हा प्रकार समाधीस्थळावर न चढलेल्या अनेकांना खटकला. पण समाधीस्थळावर उभं टाकलेले राजकारणी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शासकीय कर्मचारी,सामाजिक कार्यकर्ते, कथित नेताजी पालकर प्रेमी यांना याबाबत हटकण्याचे धाडस कोणी केले नाही. नेताजी पालकांच्या समाधीचा ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेवा येथील नदी परिसरात असून येथे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून शिवप्रेमी व पालकर प्रेमी येतात. श्रमदान व साफसफाई करतात. पण हेरिटेज वॉकच्या नावाने झालेला अनादराचा प्रकार टिकेचा धनी बनला आहे. या संतापजनक प्रकाराची चर्चा शहरात होऊन समाधीस्थळावर चढून अनादर होण्याचा निषेध व्यक्त करणा-्या प्रतिक्रिया उमटत आहेत. पवित्र समाधीस्थळाचा अवमान करून अनादर करणा-्या संबंधिताविरुद्ध कारवाई होण्याची मागणी शिवप्रेमी तसेच नेताजी पालकर प्रेमी यांच्यातून होत आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या