30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeनांदेडनिराधाराचे अनुदान त्वरित वाटप करा; बहुजन समाज पार्टीचा आंदोलनाचा इशारा

निराधाराचे अनुदान त्वरित वाटप करा; बहुजन समाज पार्टीचा आंदोलनाचा इशारा

एकमत ऑनलाईन

हदगाव (प्रतिनिधी) : निराधाराचे गेल्या चार महिन्या पासून रखडलेले अनुदान त्वरित वाटप करण्या बाबतचे निवेदन बहुजन समाज पार्टीने हदगाव तहसीलदार यांना दिले होते.परंतु निवेदन देऊन आज तीन आठवडे झाले तरीपण शासनाने अद्याप दखल घेतली नसल्याने पुन्हा एकदा बसपाच्या वतीने आंदोलन झेडण्याचा इशारा दिला आहे .

हदगाव तालुक्यातील श्रावण बाळ, अपंग, विधवा, परितक्त्या संजय गांधी निराधार योजने मधील लाभार्थ्यांना चार महिने होऊनही अद्याप त्यांचे मानधन मिळाले नसल्यामुळे येथील लाभार्थ्यांचे अतिशय हाल होऊन त्यांच्यावर खरोखर उपासमारीची व भूकबळीची वेळ आली आहे.महाराष्ट्र शासनाने अपंगांना काम होत नसल्यामुळे, श्रावण बाळ योजनेतील वयोवृद्ध व्यक्तींना काम होत नसल्यामुळे, ज्या व्यक्तींना कोणाचाही आधार नसल्यामुळे निराधार व्यक्तींना व तसेच त्यांच्या घरातील ज्येष्ठ म्हणजेच कुटुंबांचा संपूर्ण प्रपंच चालवणारा कुटुंब प्रमुख व्यक्ती गेलेल्या विधवा महिलांना, तसेच काही महिलांना आपल्या पतीने, सोडलेल्या परितक्त्या महिलांसाठी त्यांचा उदरनिर्वाह सुरळीतपणे पार पडावे म्हणून हा हेतू डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधारची निर्मिती केली.

परंतु गेले पाच महिन्या पासून अनुदान रखडल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.म्हणून निराधाराना अनुदान त्वरित वाटप नाही केले तर बहुजन समाज पार्टी तर्फे आंदोलन छेडण्यात येईल अश्या प्रकारचे निवेदन बसपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत भोरे.विधानसभा अध्यक्ष साहेबराव नरवाडे.सुनील कांबळे.शहर अध्यक्ष पंजाब वाठोरे ( सचिव ) संघपाल पाईकराव ( महासचिव) महमुद पठाण बबन जमदाडे यांनी दिले आहे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या