26.1 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeनांदेडउमरी नगर परिषदे तर्फे महिला बचत गटांना नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण

उमरी नगर परिषदे तर्फे महिला बचत गटांना नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण

एकमत ऑनलाईन

उमरी ता प्रतिनिधी
नगरपरिषद उमरी जि.नांदेड अंतर्गत दिनदयाळ अत्योदय – राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत सन २०२१-२२ अंतर्गत स्थापित एकुण २२ महिला बचत गटांना नोंदणी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

उमरी नगरपरिषद कार्यालय येथे दिनांक २६/०५/२०२२ रोजी शहरातील महिला बचत गटांना मा.मुख्याधिकारी श्री.गणेश रामचंद्र चाटे यांनी बचत गटांना नगर परिषदे अंतर्गत राबविण्यात येणा-या विविध उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देवुन त्यामध्ये सन २०२१-२२ अंतर्गत एकुण १६ महिला बचत गटांना बँकेकडुन रु.२४.०० लक्ष एवढा निधी लोन च्या माध्यमातुन उपलब्ध करुन देण्यात आला. तसेच ०३ महिने पुर्ण करणा-या एकुण १७ महिला बचत गटांना रु.१ लक्ष ७० हजार एवढा फिरता निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

उपलब्ध करुन देण्यात आलेल्या निधीतुन बचत गटांच्या माध्यमातुन विविध उपजिविकेच्या साधनाद्वारे उत्पन्न वाढ करण्याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच सन २०२२-२३ अंतर्गत मानव विकास कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त महिला बचत गटांनी लाभ घ्यावे असे आवाहन करण्यात आले.

यावेळी उमरी नगर परिषद कार्यालय अधिक्षक, श्री.अर्जुन गव्हाणे, स्थापत्य अभियंता श्री.संतोष मुंढे,जोतिराम जाधव लेखापाल, वरिष्ठ लिपीक श्री.गणेश मदने,सचिन गंगासागरे,सुरेश मळवरकर,रमाबाई करपे,चंद्रकांत श्रीकांबळे, संगीता हेमके,गंगाधर पवार, आकाश खदारे,सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री.गायकवाड पि.एम., समुदाय संघटक श्री.खंदारे नरेंद्र,बनसोडे मॅडम मा.वि.म च्या सहयोगीनि नगरपरिषद अधिकारी/कर्मचारी व महिला बचत गटातील सदस्य उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या