23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeनांदेडउमरी येथे महिला बचत गटांना नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण

उमरी येथे महिला बचत गटांना नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण

एकमत ऑनलाईन

उमरी : शहरातील महिला बचत गटांना उमरी नगरपरिषदेमार्फत नोंदणी प्रमाणपत्र वितरण नगरपरिषद उमरी जि. नांदेड अंतर्गत दिनदयाळ अत्योदय राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत सन २०२१-२२ अंतर्गत स्थापित एकुण २२ महिला बचत गटांना नोंदणी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

उमरी नगरपरिषद कार्यालय येथे दिनांक २६/०५/२०२२ रोजी शहरातील महिला बचत गटांना मुख्याधिकारी गणेश रामचंद्र चाटे यांनी बचत गटांना नगर परिषदे अंतर्गत राबविण्यात येणा-या विविध उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देवुन त्यामध्ये सन २०२१-२२ अंतर्गत एकुण १६ महिला बचत गटांना बँकेकडुन रु. २४.०० लक्ष एवढा निधी लोनच्या माध्यमातुन उपलब्ध करून देण्यात आला. तसेच ३ महिने पुर्ण करणा-या एकुण १७ महिला बचत गटांना रु. १ लक्ष ७० हजार एवढा फिरता निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

उपलब्ध करुन देण्यात आलेल्या निधीतून बचत गटांच्या माध्यमातून विविध उपजिविकेच्या साधनाद्वारे उत्पन्न वाढ करण्याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच सन २०२२-२३ अंतर्गत मानव विकास कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त महिला बचत गटांनी लाभ घ्यावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी उमरी नगर परिषद कार्यालय अधिक्षक, अर्जुन गव्हाणे, स्थापत्य अभियंता संतोष मुंढे, जोतिराम जाधव लेखापाल, वरिष्ठ लिपीक गणेश मदने, सचिन गंगासागरे, सुरेश मळवरकर, रमाबाई करपे, चंद्रकांत कांबळे, संगीता हेमके, गंगाधर पवार, आकाश खदारे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी गायकवाड पि.एम., समुदाय संघटक खंदारे नरेंद्र, बनसोडे मा.वि.म च्या सहयोगीनि नगरपरिषद अधिकारी/कर्मचारी व महिला बचत गटातील सदस्य उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या