नांदेड : जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील ९०७ ग्रामपंचायतीसाठीचीमतमोजणी आज सोमवार १८ जानेवारी रोजी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी सकाळी १० वाजेपासून सुरु होणार आहे. याअनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक असलेली सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी दिली.
नांदेड जिल्हयातील ९०७ ग्रामपंचायतीसाठी दि.१५ जानेवारी रोजी मतदान झाले.जिल्हयातील २ हजार ९१३ मतदान केंद्रावरील मतयंत्रात शेकडो गावकारभा-यांचे भवितव्य बंद झाल्यानंतर मतमोजणी तथा कोण निवडणूक येणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.आज सोमवारी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीस सुरु होणार आहे. नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायतीची मतमोजणी ही माहिती व तंत्रज्ञान इमारत स्थापत्य अभियंत्रिकी विभाग शासकिय तंत्रनिकेतन कॉलेज नांदेड येथे होणार आहे. तर अधार्पूर तालुक्यासाठी- तहसिल कार्यालय अधार्पूर. भोकर- तळमजला तहसिल कार्यालय भोकर. मुदखेड- तहसिल कार्यालय मुदखेड. हदगाव- मागासवर्गीय शासकिय मुलींचे वसतीगृह तामसा रोड हदगाव. हिमायतनगर- तहसिल कार्यालय हिमायतनगर. किनवट- औद्योगिक प्रशिक्षण संस्था तळमजला किनवट. माहूर- तहसिल कार्यालय माहूर येथील सभागृह. धमार्बाद- शासकीय तंत्रप्रशाला आयटीआय बासर रोड धमार्बाद. उमरी- तहसिल कार्यालय उमरी. बिलोली- तहसिल कार्यालय बिलोली. नायगाव- तहसिल कार्यालय नायगाव. देगलूर- प्रशासकीय इमारत पंचायत समिती सभागृह देगलूर. मुखेड- तहसिल कार्यालय मुखेड. कंधार- श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पानभोसी रोड कंधार तर लोहा तालुक्यातील ग्रामपंचायतीची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लातूर रोड लोहा येथे मतमोजणी होईल.
ही मतमोजणी सकाळी १० वाजेपासून सुरु होऊन मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत सुरु राहिल. मतमोजणी केंद्र परिसरात इतर व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. मतमोजणीच्या ठिकाणी जर त्याच दिवशी आठवडी बाजार असतील तर ते बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.
तालुकानिहाय ग्रा.पं.ची संख्या
निवडणूक झालेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या नांदेड तालुका एकुण ५८ , अर्धापुर ३७, भोकर ५१, मुदखेड ४०, हदगाव ९५, हिमायतनगर ४७, किनवट २४, माहूर १०, धर्र्माबाद ३७, उमरी ४८, बिलोली ६०, नायगाव खै.६३, देगलूर ७६, मुखेड १०२, कंधार ८२, लोहा ७७ अशा एकुण ९०७ ग्राम पंचायतच्या निवडणूका घेण्यात आल्या. त्यात जिल्ह्यात सरासरी ८२.६६ टक्के मतदान झाले असून आज तालुकानिहाय मतमोजणी होणार आहे.
खासदार, आमदारांची प्रतिष्ठा पणाला
जिल्ह्यात पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणूकीत राजकीय प्रतिष्ठापणाला लागली असून खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना निवडूण आणण्यासाठी प्रतिष्ठापणाला लावली होती.तर आ. मोहन हंबर्डे, शामसुंदर शिंदे, माधवराव पाटील जवळगावकर, आ.तुषार राठोड, आ.भीमराव केराम, आ.बालाजी कल्याणकर, आ.अमर राजूरकर यांच्यासह इतर राजकीय पदाधिका-यांनी ग्रा.पं.ची निवडणूक जिंकण्यासाठी प्रतिष्ठापणाला लावली होती.
डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना लसीचा प्रारंभ