24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeनांदेडमहामार्गाच्या कामा संदर्भात जिल्हाधिका-यांनी बोलावली बैठक

महामार्गाच्या कामा संदर्भात जिल्हाधिका-यांनी बोलावली बैठक

एकमत ऑनलाईन

(माहूर ता.प्र.): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ अ रस्त्याचे काम महामार्ग नियमाप्रमाणे करुन माहूर शहरात पूर्वी प्रमाणे दुभाजक, १०० फुटावर नाली आणि सर्व्हिस रोड निर्माण करा या मागणी साठी माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना निवेदन दिले होते. निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीमध्ये किनवटचे तहसीलदार आणि प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार माहूर यांच्या समवेत दिनांक २४ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आल्याने या बैठकीत माहूर शहराचे विद्रुपीकरण थांबून दुभाजक सहित महामार्ग नियमानुसार रस्ते व नाल्या निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

माहूर शहरातून जाणा-या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ (अ) रस्त्याचे काम पूर्वीच्या अंदाज पत्रकाप्रमाणे न करता १०० फुट एवढे करून मधोमध दूभाजक व नाली या प्रमाणे करण्यात यावे. जेणे करून भविष्यात रहदारीला अडथळा होणार नाही, तसेच अतिक्रमण होवून शहराचे विद्रुपीकरण ही होणार नाही. या संदर्भात नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी ते जिल्हाधिकारी यांच्या पर्यंत निवेदन दिले होते. त्या नंतर सर्वपक्षीय नगरसेवक,सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संघटनेच्या वतीने ही निवेदन देण्यात आले होते. तर त्या पूर्वी माहूर शहरात राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात वर्गीकरण करून रुंदीकरणाचे काम सुरू आहे.

या कामात प्रचंड अनियमितता असल्याने माजी आमदार प्रदीप नाईक यांनी गत दोन महिन्यापूर्वी या संदर्भात रान उठविले होते. त्या नंतर जिल्हाधिका-यानी दखल घेतली, मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या निर्लज्ज अधिका-यांनी दुर्लक्ष केले. महामार्ग विभागाच्या कामचलाऊ धोरणा मुळे माहूर शहर वाशियाना राष्ट्रीय महामार्ग विभागा कडून अपेक्षा उरली नसून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनीच २४ रोजीच्या बैठकीत यशस्वी तोडगा काढून माहूर शहराचे विद्रुपीकरण थांबवून तीर्थक्षेत्राला साजेसे रूप देण्यासाठी महामार्ग विभागाची कानउघाडणी करावी अशी अपेक्षा माहूर कर धरुन आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या