27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeनांदेडजिल्हा रोगमुक्त... हेच कंठेवाड बंधूंचे अंतिम ध्येय

जिल्हा रोगमुक्त… हेच कंठेवाड बंधूंचे अंतिम ध्येय

एकमत ऑनलाईन

नांदेड : उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण संकल्पना व उपक्रम कंठेवाडबंधू नेहमीच करत असतात. यावेळी त्यांनी आरोग्याची वेगळी वाट निर्माण करत आहेत. गुरु गॅस इन्डस्ट्रीज प्रकल्प निर्मिती करुन नांदेड जिल्हा रोगमुक्त करण्याचे अंतिम ध्येय कंठेवाड बंधूंनी घेतले आहे. या प्रकल्पाचा शानदार सोहळा शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) सकाळी ११.५0 वाजता औद्योगिक वसाहत प्लॉट क्र. १0२ सिडको येथे संपन्न होणार असून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती कंठेवाड बंधुंनी दिली आहे.

मराठवाड्याचे तथा नांदेड जिल्ह्याचे सर्व्हेसर्वाह असलेले ना. अशोकराव चव्हाण यांनी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजन व इतर सुविधा कुठेही कमी पडू नयेत यासाठी उद्योजकांनी ऑक्सिजन निर्मिती करणारे उद्योग उभारावेत असे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत कंठेवाड बंधुंनी नवीन उद्योगात पाऊ ल टाकत नांदेड जिल्हा रोगमुक्त करण्याचे अंतिम ध्येय त्यांनी उराशी बाळगून हा उद्योग सुरु केला आहे. त्यामुळे नांदेडकरांना आता आरोग्याची पंढरी आली दारी असेच म्हणावे लागेल. कंठेवाड बंधुंनी गुरु गॅस इन्डस्ट्रीज प्रकल्प निर्मितीच्या माध्यमातून आरोग्य विषयक सेवा देण्याचा प्रकल्प उभा केला असून हा प्रकल्प नांदेडकरांसाठी भविष्यात आनंददायी व दिलासा देणारा ठरणार आहे.

पुढील काळात रुग्णांच्या सेवेसाठी अतिशय माफक दरात हा प्रकल्प सजीवनी ठरणार आहे. या सेवेचा शहरातील व जिल्हाभरातील रुग्णालयांनी लाभ घ्यावा असे आवाहन कंठेवाड बंधूंनी केले आहे.कंठेवाड बंधू उद्योग समुहाने सामाजिक दातृत्व व सेवावृत्ती जोपासत गो सेवा प्रकल्प, नांदेड क्रिटीकल केअर सेंटर तसेच अनेक शैक्षणिक उपक्रम यशस्वीपणे राबवून गुणात्मक व दर्जात्मक सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्याच धर्तीवर गुरू गॅस इन्डस्ट्रीज प्रकल्प निर्मितीच्या माध्यमातून मेडिकल ऑक्सिजन, इंडस्ट्रीयल ऑक्सिजन व नायट्रोजन गॅस प्रकल्पाची निर्मिती केली आहे. या प्रकल्पासाठी प्रोजेक्ट मॅनेजर कपित लोकावर, ऑक्सिप्लॅन्ट प्रा.लि.चे भीमकुमार ठाकूर, प्लान्ट इंचार्ज राजू पवार, सिव्हील इंजिनीअर राहुल बल्लमखाने हे परिश्रम घेत असून या ऑक्सिजन प्रकल्पाद्वारे दररोज ७ क्युबिक मीटरचे ५१४ सिलिंडर उपलब्ध होणार आहेत.

जेणेकरून जिल्हाभरातील रूग्णालयासाठी ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, अशी माहिती कंठेवाड बंधुंनी दिली. या प्रकल्पातील तज्ज्ञ व अनुभवी अधिकारी, राज्यातील व परराज्यातील कुशल आणि कौशल्यपूर्ण कर्मचारीवर्गाच्या परिश्रमातून प्रकल्प पूर्णत्वास आला असल्याचे सांगत या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कंठेवाड बंधू यांनी केले आहे.

कुर्डूवाडी- भिगवण विद्युतीकरण मार्गाला हिरवा कंदील

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या