मांडवी (प्रतिनिधी) : दिव्यांग वृद्ध निराधार यांच्या पंधरा दिवसाच्या आत हक्क द्या नाहीतर झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी संघटनेच्या वतीने किनवट तहसीलदारांच्या दालनात झोपाकाढो आंदोलन करण्याच्या ईशारा दिव्यांग संघटनाच्या वतीने तहसीलदाराना निवेदना मार्फत देण्यात आहे.
दिव्यांग वृद्ध निराधार योजनेचे थकीत अनुदान त्वरित देण्यात यावे ,दिव्यांग वृद्ध निराधार योजनेचे केंद्र सरकार कडून मिळणारे अनुदान मागील तीन महिन्यापासून मिळालेला नाही ते मिळवून द्यावे ,राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान मागील चार महिन्यापासून मिळालेला नाही त्वरित द्यावे ,दिव्यांगांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करून त्यांना या योजनेचा लाभ घ्यावा, संजय गांधी व इतर योजनेत पात्र लाभार्थी निवड एक -एक वर्ष होत नाही ते त्वरित निवडकरून त्यांना लाभ देण्यात यावा, संजय गांधी निराधार योजनेच्या कमिटीत दिव्यांग बांधवाना सदस्य म्हणून नेमणूक करावा यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार किनवट यांना देण्यात आले.
या मागण्या मान्य न झाल्यास तहसीलदारांच्या दालनात झोपा काढो आंदोलन करण्याचा ईशारा दिव्यांग संघटनेचे राज्य अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील,ता .अध्यक्ष.संजय श्रीमनावार ,मांडवी सर्कल अध्यक्ष अंकुश राठोड ,आनंद मेश्राम, उकंडराव पुरके ,बालिताई जंगीलवाड, राजू आदे,कांशीराम पुरके ,कैलास भालेराव आदींनी दिला आहे.
‘होय सुशांत ड्रग्ज घेत होता’,सारा अली खान, श्रद्धा कपूरने चौकशी दरम्यान दिली कबुली