19.1 C
Latur
Wednesday, January 20, 2021
Home नांदेड तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी संपता संपेना

तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी संपता संपेना

एकमत ऑनलाईन

हदगाव : दिवाळी सण संपून आज पंधरा दिवस उलटूनही गेले परंतु हदगाव येथील तहसील कार्यालयातील व पंचायत समिती कार्यालयातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी संपता संपत नसल्याने तालुक्यातील जनतेचे अनेक कामे खोळंबली आहेत.शुक्रवारी दुपारीअनेक नागरिक तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालयात कामानिमित्त गेले असता कार्यालयात कमी कर्मचारी असल्याचे दिसून आले.

गेल्या आठवड्यात १९ नोव्हेंबर तालुक्यातील ११८ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यामुळे ईच्छुक उमेदवारांनी जात पडताळणीचे कागदपत्रे घेऊन तहसील कार्यालयाकडे धाव घेतली व तसेच कोरोना लॉकडाऊन मध्येअनेक दिवसांपासून बंद असलेले राशनकार्ड पुन्हा देण्यास सुरुवात केली आहे तसेच अपंग निराधार वृद्ध महिलांनाची कागजपत्रे दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात एकच गर्दी होत आहे परंतु कर्मचाऱ्यांना विचारपूस करण्यासाठी तेथील कर्मचारी हजर नसल्याने त्यांना निराशेने स्वतःचे पैसे खर्च करून घरी परतावे लागत आहे.

जे स्थिती तहसील कार्यालयात होती तीच स्थिती पंचायत समिती कार्यालयात पहावयास मिळाली पंचायत विभाग मध्ये निवडक कर्मचारी होते बांधकाम विभागात नुसत्या खुर्च्या दिसून आल्या आस्था विभागात दोन कर्मचारी तर पाणी पुरवठा रोजगार हमी योजना एक एक कर्मचारी दिसून आले.घरकुल बांधकाम केलेल्या कामाचे चेक थकीत झाल्यामुळे कार्यालयात नागरिकांनी गर्दी केली होती.शनिवार रविवार. आणि सोमवारी सुट्यात भर पडल्याने अनेक नागरिकांची कामे खोळंबली आहेत

उद्या ९ जणांचा आत्मदहनाचा इशारा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या