22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeनांदेडपरतीच्या पावसामुळे शेतक‍-यांची दिवाळी अंधारात

परतीच्या पावसामुळे शेतक‍-यांची दिवाळी अंधारात

एकमत ऑनलाईन

शिवणी: किनवट तालुक्यातील शिवणी व अप्पारावपेट परिसरातील परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसाने सोयाबीनला तर मोडे फुटली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर शिवणी परिसरात झालेल्या परतीच्या अवकाळी पावसाने कापलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले असल्याने यावषीर्ची शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात जाते की काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

शिवणी पसिरात झालेल्या परतीच्या पावसाने काढणीला आलेल्या खरीप हंगामातील पिकाचे विशेष करून सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले आहे. परिसरासह संबंध किनवट तालुक्यातच परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकुळ घातला असून शेतकर्‍यांच्या हाती आलेला कापूस, सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीनलामोड फुटून तर कापसाला बोंडे नासून गेल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने शेतकर्‍यांच्या नगदी पिकाचे वाटोळे केल्यामुळे यावषीर्ची शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात जाते की काय? अशी चिंता व्यक्त करीत आहेत.दिवाळी अगदी तोंडावर आली असतांनाही परतीचा पाऊस काही शेतकर्‍यांची पाठ सोडण्यास तयार नाही.

शिवणी भागात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातल्यामुळे हजारो हेक्टरवरिल सोयाबीन, कापसाचे प्रचंड नुकसान झाले आहे परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे अहवाल देऊन शेतकर्‍यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी पुढे येताच शासनाने पंचनामे करण्यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, अधिकारी, ग्रामसेवकांची पथके तयार करुन पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, अशीही मागणी केली जात आहे.
दिवाळीपुर्वीच शेतकर्‍यावर संकट कोसळले असल्यने कापूस, सोयाबीन, पाण्यात तरंगत आहे. हे सगळ याची देही, याची डोळा पाहतांना जीव कासविस होत आहे.

अवकाळी पावसाने मागील अनेक दिवसांपासून थैमान घातले आहे. सोयाबीन कापणी केलेले दररोज पलटी करणे, ढग झाकण्यासाठी ताडपत्री खर्च करणे,मळणी यंत्राने काढण्यासाठी विविध अडचणी, शेतमाल करणे व विक्री करण्यासाठी मालाची प्रत चांगली येत नसल्याने बाजारपेठेत दर कोसळले असून नाईलाजाने बेभाव विकणे भाग पडत आहे. दिवाळीच्या अगोदर हाताशी आलेले सोयाबीन कापूस पीक अवकाळी पावसामुळे सुख हिरावून घेत अनेक विविध अडचणी निर्माण झाल्या असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तोंडावर आलेल्या सणावर सोयाबीन शेतात भिजुन जाऊन कोंब फुटत असल्याने येणारी सणे कशी साजरी कशी करावी हा प्रश्न सतावत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या