नांदेड : कोरोनाग्रस्तांची संख्या दररोज वाढत असतांना नांदेडकरांना बुधवारी मोठा धक्का बसला़ मंगळवारी रात्रीपासून बुधवार सांयकाळपर्यंत १२ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने रूग्णांचा आकडा २०३ वर गेला आहे़ तर बुधवारी एकाच दिवशी दोघांचा मृत्यु झाला ़ नांदेड जिल्हयात आता कोरोना रूग्णांनी व्दिशतक पार केले असून आत्तापर्यंत अकरा जण बाद झाले आहेत़यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे.
आरोग्य विभागास मंगळवारी प्रलंबित असलेल्या स्वॅबपैकी बुधवारी ६० स्वॅब अहवाल प्राप्त झाले . त्यापैकी ४९ स्वॅब नमुने अहवाल निगेटिव्ह तर १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यापूर्वी मंगळवारी रात्री उशिरा दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे २० तासात १२ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या २०३ एवढी झाली आहे. तर ११ पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
बुधवार दि.१० मृत्यू झालेल्या दोन रुग्णापैकी एक रुग्ण शहरातील इतवारा भागातील ६५ वर्षीय व्यक्ती असून, दुसरा रुग्ण हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील ४५ वर्षीय असल्याचे सांगण्यात आले. या दोन्ही रुग्णावर विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. मृत्यू झालेल्या रुग्णास उच्चरक्तदाब, श्वासनाचा त्रास आणि मधुमेह आजार होते. तर नव्याने पॉझिटिव्ह रुग्णामध्ये आठ पुरुषांचा समावेश असून, त्यांचे वय अनुक्रमे १२, ४३, ४५, ४७, ४८, ५४, ५५ व सहा महिण्याच्या एका बालकाचा समावेश आहे. त्यातील पाच रुग्ण इतवारा भागातील असून, एक रुग्ण मालेगाव रोड आणि दोन रुग्ण सिडको परिसरातील आहेत. तर दोन पॉझिटिव्ह महिला रुग्णाचे वय १० आणि ५० वर्ष वयोगटातील असून, हे इतवारा व चौफाळा येथील असल्याचे पुढे आले आहे.
मंगळवार रात्रीपासून ते बुधवारी सांयकाळपर्यंत केवळ वीस तासात नवीन १२ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत़ तर बुधवारी एकाच दिवशी दोन रूग्णांचा मृत्यु झाला़ कोरोनाचे एकुण रूग्ण २०३ झाले असून नांदेड जिल्हयात आता कोरोना रूग्णांनी व्दिशतक पार केले आहे़तर आत्तापर्यंत अकरा जण बाद झाले आहेत़यामुळे सर्व सामान्य नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे.
दरम्यान २०३ पॉझिटिव्ह रुग्णापैकी १३७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर ५५ रुग्णावर उपचार सुरु आहेत. यातील तीन रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. यात एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. बुधवारी पुन्हा नव्याने ७९ स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असून, आज दि़ ११ जून रोजी संध्याकाळपर्यंत हे अहवाल प्राप्त होण्याची शक्यता असल्याचे शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगीतले़
नव्या रूग्णात ६ महिन्याच्या एका बालकाचा समावेश नव्याने पॉझिटिव्ह रुग्णामध्ये आठ पुरुषांचा समावेश असून, त्यांचे वय अनुक्रमे १२, ४३, ४५, ४७, ४८, ५४, ५५ व सहा महिण्याच्या एका बालकाचा समावेश आहे. त्यातील पाच रुग्ण इतवारा भागातील असून, एक रुग्ण मालेगाव रोड आणि दोन रुग्ण सिडको परिसरातील आहेत. तर दोन पॉझिटिव्ह महिला रुग्णाचे वय १० आणि ५० वर्ष वयोगटातील असून, हे इतवारा व चौफाळा येथील असल्याचे पुढे आले आहे़
सिडको भागात २ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह
सिडको ,हडको भागात आतापर्यंत एकही कोरोना बांधीत रुग्ण सापडला नव्हता ़मात्र बुधवारच्या अहवालात नायगाव तालुक्यातील मात्र हडको भागातील लहुजी नगर येथे व सिडको भागात एक पुरुष पॉझीटीव्ह आढळून आले आहेत.यामुळे खळबळ उडाली आहे.
नायगाव तालुक्यातील एक जन हडको भागातील लहुजी नगर परीसरात गेले काही दिवसांपासून राहतं होता . तो मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या आव्हालात पॉझीटीव्ह आढळून आला सुरवातीला जिल्हा प्रशासनाच्या वतीने नायगाव तालुक्यातील एक पॉझीटीव्ह म्हणून घोषित केले होते मात्र तो हडको भागात वास्तव्यास होता. तर बुधवारी दुपारी प्राप्त झालेल्या आव्हालात सिडको भागातील एक रूग्ण कोरोना पॉझीटीव्ह आढळून आल्यामुळे सिडको भागातील एकुण दोन रुग्ण संख्या झाली आहे.
या प्रकरणाची दखल घेत महानगरपालिकाचे आयुक्त माळी यांच्या आदेशानुसार सिडको झोनचे सहायक आयुक्त रावण सोनसळे व त्यांच्या सहकाºयांनी हा भाग कंटेटमेन्ट झोन घोषित करून या भागात बॅरिकेड्स लावण्याचे काम सुरू केले होते.आजवर सिडको भागातील नागरिक बिनधास्त पणे रस्त्यावर फिरताना दिसुन येत होते मात्र मंगळवारी प्राप्त झालेल्या आव्हालात या भागातील लहुजी नगर येथील वास्तव्यास आसलेला एक रूग्ण कोरोना बांधीत आढळून आल्यामुळे बुधवारी दुपारी पासून सिडको हडको भागात सुमसाम वातावरण निर्माण झाले आहे़