23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeनांदेडलहानच्या शेत शिवारात फुलला ड्रगन फ्रुट चा मळा

लहानच्या शेत शिवारात फुलला ड्रगन फ्रुट चा मळा

एकमत ऑनलाईन

अधार्पूर : पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिकतेची कास धरीत अधार्पूर तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तमराव इंगळे यांनी आपल्या शेतीत ड्रॅगन फ्रूट ची लागवड करून प्रचंड उत्पादन मिळविले आहे. त्यांच्या या यशस्वी शेतीच्या प्रयोगाची सर्वत्र जोरदार चर्चा असून दररोज अनेक शेतकरी ड्रॅगन फ्रूट चा मळा पाहण्यासाठी लहान येथे येत आहेत.

ड्रॅगन फ्रूट हे अमेरिकन फळ असून महाराष्ट्रात अत्यंत दुर्मिळ असणारे पीक समजले जाते. साधारणपणे थायलंड या देशात याची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु केवळ प्रयोग म्हणून थायलंडच्या धर्तीवर अधार्पूर तालुक्यातील लहान येथील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी उत्तमराव इंगळे हे लहान येथे शेती व्यवसाय करित आहेत. या परिसरात त्यांची एकूण १८ एकर शेतजमीन आहे. त्यापैकी २ एकर शेत जमीनीत त्यांनी ड्रॅगन फ्रूट ची लागवड केली आहे. या पिकाची लागवड वेल स्वरूपाची असल्याने वाढत्या वेलीला आधार देण्यासाठी शेतात सिमेंटचे खांब रोवण्यात आले आहेत. रोप लागवडीनंतर एका वषार्ला फळ धारणा सुरू झाली असून पुढील २० ते २५ वर्षे उत्पन्न घेता येईल. असे नियोजन करण्यात आले आहे.

ड्रॅगन फ्रूट हे निवडुंगासारख्या दिसणा-्या काटेरी वेलाला साधारणपणे जुलै ते नोव्हेंबर दरम्यान फळे येतात. एका झाडापासून तयार वेलींना एका तोडनिस सहा ते आठ फळे येतात. या फळास त्यांच्या दजार्नुसार साधारणपणे प्रती किलो १०० ते १५० रुपये भाव मिळतो. हे फळ प्रत्येक माणसाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असून या फळाच्या शेवनाने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तसेच रक्तातील पांढ-्या पेशींची वाढ होते. यामुळे या फळाला बाजारात मोठी मागणी असते. अशी माहिती डॉ. उत्तमराव इंगळे यांनी दिली आहे.

लहान येथील डॉ. उत्तमराव इंगळे यांनी जुलै २०१९ मध्ये दोन एकर शेत जमीनीत ४ हजार ८०० रोपांची लागवड केली होती. लागवडीनंतर एक वषार्नंतर फळधारणेला सुरुवात झाली. या पिकावर मुख्यत्वे लाल मुंग्या व बुरशी या रोगाचा प्रादुर्भाव होतो. परंतु यापासून पिकाचा बचाव करण्यासाठी अत्यंत कमी खचार्ची फवारणी करावी लागते. तर लागवडीनंतर अन्य खर्च अत्याल्प असल्यामुळे हे पीक सर्व शेतक-्यांना परवडणारे असल्याचे सांगण्यात आले.

येथील शेतीत उत्पादित होणारे ड्रॅगन फ्रूट अदाजे ४०० ते ६०० ग्राम वजनाचे असून एका वेलीला एका तोडणीला ६ ते ८ फळ मिळत आहेत. तर दोन एकर क्षेत्रामध्ये १० . ८ फुट अंतरावर सिमेंटचे पोल रोवून दोन एकर क्षेत्रात ४ हजार ८०० झाडांची लागवड करण्यात आली आहे. आज रोजी प्रत्यक्ष फळ तोडणी सुरू असून चांगल्या प्रतीचे फळ व चांगले उत्पन्न मिळत आहे. अशा प्रकारे ड्रॅगन फ्रूटची नवीन शेती पाहण्यासाठी अधार्पूर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकरी येथे येवून या फळ शेती विषयी अधिक माहिती जाणून घेत आहेत.

सध्या सर्वत्र थैमान घातलेल्या करोना आजारावर हे फळ लाभदायी असून हे फळ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते व पांढ-या पेशींचे प्रमाण वाढते. असे सांगितले जाते त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात ड्रॅगन फ्रुट ची खरेदी करताना दिसत आहेत. या फळाला सांगली, कोल्हापूर, पुणे, हैद्राबाद, नांदेड आदी ठिकाणी चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतक-्यांना अधिकचे उत्पन्न मिळत आहे.

ड्रॅगन फ्रूट ची शेती करण्यासाठी कमी खर्च होत असून हे फळ आरोग्यासाठी लाभदायक असल्याने बाजारात मोठी मागणी आहे. तसेच कमी खर्चात उत्पन्नही चांगले मिळते. त्यामुळे परिसरातील शेतक-ाांनी पारंपारिक शेती बरोबरच आधुनिक शेतीकडे वळावे यामुळे उत्पन्नात वाढ होईल. अशी माहिती प्रगतीशील शेतकरी डॉ. उत्तमराव इंगळे यांनी दैनिक एकमतशी बोलताना दिली आहे.

दोन ठिकाणी घरफोडी; साडे चार लाखांचा ऐवज लंपास

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या