37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeनांदेडउमरी नगरपालिकेतील प्रभारी राजमुळे घरकुल लाभार्थ्यांचे झाले बेहाल

उमरी नगरपालिकेतील प्रभारी राजमुळे घरकुल लाभार्थ्यांचे झाले बेहाल

एकमत ऑनलाईन

उमरी : उमरी नगरपालिकेत प्रभारी मुख्याधिकारी राजा मुळे उमरी शहरांमध्ये चालू असलेले रमाई आवास योजना घरकुल एकूण लाभार्थी १२५ व पंतप्रधान आवास घरकुल योजना एकूण३८४ प्रगतीपथावर काम चालू असताना गेल्या चार महिन्या पासून घरकुल लाभार्थ्यांना धनादेश मिळेना याचे कारण उमरी नगर पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी चे लक्ष नसल्यामुळे लाभार्थ्या धनादेश मिळत नाही.

उमरीत कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्यावा .नगरपालिकेतील मुख्याधिकारी प्रभारी असल्याने अनेक विकासात्मक कामे ठप्प झाली आहेत त्यामुळे उमरीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्यावा अशी मागणी होत आहे. उमरी नगरपालिकेतील मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांची शिर्डी येथे बदली झाल्यानंतर शिर्डी येथील मुख्याधिकार्‍यांना उमरी ला पाठविण्यात आले होते. परंतु काही काळातच त्यांनी प्रदीर्घ रजा घेऊन येथून निघून गेले आहेत. त्या नंतर मुख्याधिकारी पदाचा पदभार बिलोली तहशिल कार्यालयातील नायब तहसीलदार शंकर नरावाड यांच्याकडे देण्यात आला.

त्यांचे विशेष लक्ष उमरी नगरपालिके कडे नसल्याने, ते कायम दुर्लक्ष करीत असल्याने आणि नगर पालिका कार्यालयात येतच नसल्याने उमरी शहरातील अनेक विकासात्मक कामांना खीळ बसली आहे त्यामुळे शहराच्या विकासात्मक बाबीकडे लक्ष देण्यासाठी नगरपालिकेला कायम स्वरूपी मुख्याधिकारी देण्याची आवश्यकता आहे या कडे जिल्हाधिका-्यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे

वैवाहिक जोडीदाराच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे ही क्रूरता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या