23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeनांदेडठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे हरडफ गावचा संपर्क तुटला

ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे हरडफ गावचा संपर्क तुटला

एकमत ऑनलाईन

हदगाव : तालुक्यातील हरडफ फाटा ते हरडफ हा चार किलोमीटर अंतरावरचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत गेल्यावर्षी पूर्ण करण्यात आला परंतु गावाच्या लगत ओढा असल्याने ओढ्यावर पुल बसविणे अंदाजपत्रकामध्ये बंधनकारक होते पण ठेकेदारांनी पूल बसविण्यासाठी हलगर्जी केली असल्याने गावातील नागरिकांचा पूरामुळे गावचा संपर्क तुटत आहे.

ठेकेदारांनी पुल न बसविता रस्ता पुर्ण केला असल्याने हरडफ रहिवाश्यांना पुरातून जातांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यावर्षी शंभर टक्के पाऊस असल्याने सध्यातरी पावसाची सुरवात झाली आहे.परंतु मोठमोठे नक्षत्र आणखीन शिल्लक राहिले आहेत.अशीच जर पावसाची परिस्थिती राहिल्यास नागरीकांना मरणयातना सोसाव्या लागणार आहेत .तीन हजार लोकसंख्या असलेल्या हरडफ गावात दवाखाना उपलब्ध नसल्याने महिलांना बाळंतपणासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते भविष्यात साथीचे रोग बळकावले आणि ओढ्याला पूर आला तर रुग्णांची सुरक्षा वा-्यावरच आहे.

अशा गंभीर बाबीला जबाबदार ठेकेदारांचा हलगर्जीपणाच मनावा लागेल हरडफ रस्ता दोन कोटी रुपये खर्च करून बनविण्यात आला आज रस्ता पूर्ण होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे पूर्ण उन्हाळा ठेकेदारांकडे शिल्लक असताना ओढ्यावर पूल बसविण्यासाठी टाळाटाळ केल्यामुळे हरडफ गावच्या रहिवाश्यांची बेहाल होत आहे.गेल्या दोन दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पहिल्याच दिवशी ओढ्याला पूर आला हा पूर उतरण्यासाठी नागरिकांना तासोनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे या नाल्याची रुंदीकरण नसल्याने व नाल्यामध्ये झाडेझुडपे वाढल्यामुळे पूर नाल्यातून न जाता शेजारी असलेल्या शेतकऱ्याच्या शेतातून गेल्यामुळे शेतक-यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

नव्यानेच हदगाव हरडफ मार्ग हिमायतनगर बससेवा चालू करण्यात आली होती परंतु सतत थोड्या थोड्या पाण्यामुळे पूर येत असल्याने ही बससेवा सुद्धा त्या नाल्यामुळे ठप्प झाली आहे.याच पुलावरून हरडफ.धोत्रा. रावनगाव. देवसरी .कारखेड.कामारी.अनेक गावाच्या वाहनांची येजा याच पुलावरून केली जाते जास्त रहदारीचा पूल असल्याने या पुलाची उंची व मजबुतीकरण चांगल्या दजार्चे करावे पावसाळा संपताच या पुलाच्या कामाला सुरवात करावी अशी मागणी हरडफ रहिवाशांतुन होत आहे.

गूढ नि गहिरे… रंग पावसाचे!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या