26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeनांदेडनिराधारांचे प्रस्ताव धुळखात

निराधारांचे प्रस्ताव धुळखात

एकमत ऑनलाईन

कंधार : तालुक्यातील चार महिन्यांपासून निराधाराचे पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव तहसील कार्यालयाने मंजुरीची बैठक न घेतल्यामुळे धूळखात पडले आहेत. बैठक न घेतल्यामुळे पात्र असूनही सण उत्सवाच्या काळात लाभार्थ्याच्या पदरी निराशाच?

तालुक्यातील चार महिन्यांपासून तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व इंदिरा गांधी निराधार योजनेत पात्र असलेल्या शेकडो लाभार्थ्यांना प्रस्ताव तहसील कार्यालयाने मंजुरीची बैठक न घेतल्यामुळे धूळखात पडले आहेत. वेळेवर बैठक घेऊन प्रस्तावांना मंजुरी मिळाली असती तर लाभार्थ्यांना सण उत्सव साजरे करण्यासाठी आधार मिळाला असता पण सण उत्सवाच्या काळात लाभार्थ्याच्या पदरी निराशाच आली आहे. या बाबीकडे तहसील कार्यालय दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.

संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून निराधार व्यक्ती, नेत्रहीन, शारीरिक विकलांग, अनाथ बालके, मोठ्या आजाराने त्रस्त असलेले व्यक्ती, घटस्फोटीत महिला, परितक्त्या यांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक लाभ दिला जातो. तर ६५ वर्ष व त्यावरील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील व्यक्तीला श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेच्या माध्यमातून उदरनिर्वाहाकरिता आर्थिक मदत दिली जाते.

कंधार तालुक्यात व नगरपरिषदेंतर्गत या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या सुमारे ५ हजार ४४५ आहे. या योजनेमधून लाभ मिळावा यासाठी ४०३ पात्र उमेदवारांकडून यावर्षी ऑगस्टपर्यंत नव्याने प्रस्ताव दाखल केलेले आहेत. परंतु मे महिन्यापासून आजपर्यंत या प्रस्तावाला मंजुरीसाठी कसलीही बैठक तहसीलदार यांच्याकडून आयोजित केली नसल्याने सर्व प्रस्ताव धूळखात पडले आहेत. बैठक घेतली असती तर अपात्र व त्रुटी तील उमेदवारांना माहिती मिळाली असती व त्रुटींची पूर्तता करणे सोपे झाले असते. पात्र व निराधार असलेल्या व्यक्तींना या लाभापासून आज घडीला वंचित रहावे लागत आहे. अशातच आपचे साईनाथ मळगे यांनी तहसिलदार यांना निवेदन देऊन लवकरात लवकर बैठक घेऊन लाभार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या