24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeनांदेडदसरा हल्लाबोल मिरवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

दसरा हल्लाबोल मिरवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही शीख समाजाच्या दसरानिमित्त निघणा-या हल्लाबोल मिरवणूकीस पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र असे असताना शीख समुदायाच्या काहि अनुयायांनी सचखंड गुरूद्वार परीसरात हजारोच्या संख्येने एकत्र येत मिरवणुक काढली. या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या दीड वर्षापासुन जगभरात कोरोनाने थैमान घातले असुन यामुळे सर्व धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली होती. मात्र यंदा काहि प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दि. ७ ऑक्टोबर रोजी राज्यातील धार्मिक स्थळ उघडण्यास शासनाने परवानगी दिली. मात्र असे असले तरी गर्दी जमतील आशी धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रम विना परवागी करता येणार नसल्याचे यात सांगण्यात आले. त्यानुसार येथील सचखंड गुरूद्वारा परीसरात दरवर्षी मोठ्या उत्सात साजरा होणारा दस-या निमित्तचा हल्लाबोल मिरवणुक कार्यक्रम पोलिस विभागाने परवानगी नाकारली असतानाही हजारोचा जमाव एकत्र येत काढण्यात आली.

दरम्यान जिल्हयात जिल्हाधिकारी यांचे जमाव बंदीचे आदेश असतानाही या आदेशाचे उल्लंघन करत काही शीख समुदायाच्या अनुयायांनी हजारो समाज बांधव एकत्र येत दसरा मिरवणुक काढुन जिल्हाधिकह्यारी यांच्या शासकीय आदेशाचे उल्लंघन केले. यात हजारो समाज बांधवांनी जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन करून तोंडाला मास्क न लावता सोशल डिस्टंन्सींगचे पालन न करता कोरोना प्रादुर्भाव वाढेल आशी घातक कृती केली. त्यामुळे या प्रकरणी वजिराबाद पोलिसांनी पोउपनि रमेश खाडे यांच्या फिर्यादीवरून शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असुन, अधिक तपास पोउपनि सुरजितसिंघ माळी हे करीत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या