नांदेड : पोलिस विभागातील गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांची कामगिरी नेहमीच कौतुकास्पद असते. यापुर्वी त्यांना पोलिस विभागातील इनकाऊ’टर स्पेशालिस्ट म्हणून ओळख निर्माण केली. तर गुरुवारी रात्री शंभरहून अधिक दुचाकी वाहनांचे स्पेअरपार्ट चोरी करणा-या मोरक्यास जेरबंद करुन २६ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त करून नवीन कामगिरी केल्यामुळे पोलिस विभागात त्यांचे कौतुक होत आहे. त्यामुळे त्यांच्यासंदर्भात असे बोलल्या जात आहे की, द्वारकादासजी पाहत नाहीत कुणाची रास, कारवाई करतात बिनधास्त.
जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात झाला असल्याची ओरड होत होती. चोरट्यांनी दुचाकीवर नजर वळवली होती त्यामुळे दरदिवशी दुचाकी चोरीचे प्रमाण वाढतच होते. हा आलेख लक्षात घेवून गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी रात्री उशिरा चोरीच्या दुचाकीचे स्पेअरपार्ट विकणा-या भंगारवाल्यास अटक करुन त्यावर कारवाई करत मुद्दमाल जप्त केला आहे.
दुचाकी चोरट्यांकडून विकत घेतलेल्या दुचाकी स्पेअरपार्ट वेगवेगळे करुन विकणा-या खुदबईनगर भागातील एका भंगार विक्रेत्याला गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्या गोडाऊ नमधून सुमारे दोन ट्रक स्पेअरपार्ट पोलिसांनी जप्त केले आहेत. याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत स्पेअरपार्ट तपासणी सुरु होती.
एका आठवड्यापुर्वी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दुचाकी चोरणा-यांच्या मुस्क्या अवळल्या होत्या. त्यांच्याकडून दुचाकी जप्त केल्या. दुचाकी चोरीच्या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर चोरट्यानी या दुचाकी भंगार विक्रेत्याला विकले असल्याचे सांगितले. खुदबईनगर भागात असलेल्या भंगार विक्रेत्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर गुन्हा अन्वेषण शाखा विभागाच्या पथकाने त्याच्या घरावर धाड टाकली. त्यावेळी गाड्यांचे वेगवेगळे केलेले स्पेअरपार्ट पाहून पोलिस अधीक्षकांनी अश्चर्य व्यक्त करीत या मोरक्याच्या चांगल्याच मुस्क्या अवळा. पोलिसी खाक्या दाखवा, अजून बरेच काही उघडकीस येऊ शकते. त्यांच्या आदेशानंतर पोलिस निरीक्षक द्वारकादास यांनी पोलिसी खाक्या दाखवताच चोरट्यांनी तात्काळ दुसरी रुम दाखवली.
त्यामध्ये गाड्यांची चाके, इंजिन, दुचाकीस लागणारे लहाम मोठे पार्ट, गाड्यांचे सांगडे आदी सामानाचा खचाखच भरलेला ढिग पोलिसांना आढळून आला. जवळपास १00 ते दिडशेच्या वर दुचाकीचे सामान असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गाड्यांचे चेसेस नंबर तपासल्यानंतर निश्चीतच मोठा आकडा समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जप्त केलेल्या दुचाकीचे स्पेअरपार्ट दोन ते तीन ट्रक भरुन नेतांना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. यासंदर्भात ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक देशपांडे करीत आहेत.
वेगवेगळ्या कंपनीच्या दुचाकीचा २६ लाख ५० हजाराचा मुद्देमाला जप्त
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २६ नोव्हेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहीतीवरून शहरातील खुदबेनगर चौरस्ता परिसरात सय्यद अरबाज सय्यद पाशा यांच्या घरी छापा टाकला असता वेगवेगळ्या कंपनीच्या मोटारसायकलीचे सुट्टे पार्ट दिसुन आले. याबाबत सय्यद अरबाज पाशा यांची विचारपूस केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. पोलिस निरीक्षक चिखलीकर यांनी पाशा यांना विश्वासात घेवुन विचारपूस केली असता त्यांनी सागीतले की, ३९ इंजिन, २०० मोटारसायकलीचे हॅन्डल अंदाजे २५० शॉकअप, ९३ कार्बोरेटर, पेट्रोल टँक तसेच वेगवेगळ्या कंपनीचे मोटारसायकलीचे सुट्टे पार्ट मिळून आले आहेत. त्यांचे अंदाजे बाजारातील किंमत २६ लाख ५० हजार रूपये एवढी आहे. सुट्ट्या पार्ट मध्ये इंजिन नंबर व चेचेस नंबरवरून मुळ मालकाचा शोध घेणे सुरू आहे. आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणाहून मोटारसायकली चोरून आणून त्यांचे सुट्टे पार्ट विकत होता. या कामगीरीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर सपोनि रमाकांत पांचाळ, सलिम बेग, संजय केंद्रे , गंगाधार कदम, पद्मसिंह कांबळे, संजय जिंकलवाड, बालाजी हिंगनकर, अर्जून शिंदे, यांच्या पथकाने कामगीरी केली. या कामगीरीमुळे जिल्हा पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी त्यांचे कौतूक केले आहे.
परभणीच्या गिर्यारोहकांनी सर केला हिमालयातील हरकीदून पर्वत