नांदेड : महाराष्ट्रात येत्या दोन, तीन दिवसात भाजपचे सरकार स्थापन होईल़, असा विश्वास व्यक्त करून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन शासकीय पुजेसाठी यावेत, असे साकडे खा़ प्रताप पाटील चिखलीकर यांनी विठूरायाच्या चरणी घातले़ या दर्शनानंतर देवेंद्रसाठी खा़ चिखलीकर विठूरायाच्या पायाशी अशी चर्चा होत आहे़
राज्यात सध्या राजकीय घडामोडी सुरू असून कोणता नेता काय करतो आहे, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे़ सतत चर्चेत राहणारे नांदेडचे भाजपा खा़चिखलीकर यांनी पंढरपूर येथे जावून विठूरायाचे दर्शन घेतले़ यानंतर माध्यमाशी बोलताना खा. चिखलीकर म्हणाले की, मी पांडूरंगाचा भक्त आहे, वारकरी आहे़यामुळे गेल्या पंधरा वर्षापासून मी दर्शनासाठी येत आहे, असे सांगीतले़ तर राजकीय घडामोडीवर बोलतांना म्हणाले की, महाराष्ट्रात येत्या दोन, तीन दिवसात भाजपचे सरकार स्थापन होईल़, असा विश्वास व्यक्त करून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन शासकीय पुजेसाठी यावेत, असे साकडे यावेळी पंढरपुर येथील विठूरायाच्या चरणी घातले आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे जवळपास ५० आमदारांचे पाठबळ आहे़ शिंदे हे हिंदूत्वाच्या मुद्दयावर बाहेर पडले आहेत़ यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी हिंदूत्वाची भुमिका असलेले भाजप त्यांना यावे लागेल़ याबाबत ते लवकरच निर्णय घेतील आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असा विश्वास व्यक्त केला़ दरम्यान या दर्शनानंतर देवेंद्रसाठी खा. चिखलीकर विठूरायाच्या पायाशी अशी चर्चा होत आहे.