25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeनांदेडआधार गरजूंना उपक्रमाचा खा. चिखलीकरांच्या हस्ते शुभारंभ; अवघ्या दोन दिवसात कोव्हीड रुग्णालयाचा...

आधार गरजूंना उपक्रमाचा खा. चिखलीकरांच्या हस्ते शुभारंभ; अवघ्या दोन दिवसात कोव्हीड रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा

एकमत ऑनलाईन

नांदेड : भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोरोना वैश्विक महामारीचा पार्श्वभूमीवर आजपासून दवाखान्यात उपचार घेत आसलेल्या रूग्णांचा नातेवाईकांना जेवनाचा डब्बा देण्याचा उपक्रमाचा शुभारंभ नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या शुभहस्ते जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, आधीष्टाता डॉ.दिलीपराव म्हैसेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.वाय.एच चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, प्रदेश कार्यकारणी सदस्य संतुकराव हंबर्डे, प्रदेश कार्यकारणी सदस्य एडवोकेट चैतन्य बापू देशमुख, विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, अभियानाचे प्रमुख जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण दिलीप ठाकूर यांचे प्रमुख उपस्थितीत विष्णूपुरी येथील डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय हॉस्पिटल, नांदेड येथे करण्यात आला.

मागील वर्षी कोरोना महामारमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये भाजप जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या नेतृत्वात कम्युनिटी किचनद्वारे असंख्य गरजूंना अन्न पुरवण्याचा काम मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते. यावषीर्ही कोरोनामुळे अनेक कुटुंब बाधित झाले असून अनेकांच्या घरचे रुग्ण वेगवेगळ्या दवाखान्यामध्ये उपचार घेत आहे. अशावेळी त्या रुग्णांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना आधार देण्यासाठी त्यांची पोटाची भूक भागविण्यासाठी भाजपच्यावतीने आधार गरजूंना हा उपक्रमाद्वारे दररोज १००० जेवनाचे भरलेले डब्बे पुरविण्याचे काम खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सुचनेनुसार जिल्हाध्यक्ष प्रविण साले, सरचिटणीस दिलीप ठाकूर यांच्या प्रयत्नाने सुरू करण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे, नगरसेवक राजू गोरे, नगरसेवक जनार्दन गुपीले, सिडको मंडळ अध्यक्ष वैजनाथ देशमुख, दक्षिण ग्रामीण मंडळ अध्यक्ष सुनील मोरे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अमोल ढगे, जिल्हा चिटणीस मनोज जाधव, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख धीरज स्वामी, सोशल मीडिया प्रमुख राज यादव, कार्यालय चिटणीस कुणाल गजभारे, आनंद दासरवार, अरुणकुमार काबरा, संतोष भारतीय, गजानन कत्ते, उमेश स्वामी, मंगेश कदम, शाहू महाराज, विशाल दगडू अनेकांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धर्मभूषण दिलीप ठाकूर, अरुणकुमार काबरा, संतोष भारतीय यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धर्मभूषण दिलीप ठाकूर यांनी तर संचालन धीरज स्वामी यांनी केले.

जिल्हा बँकेत घडलेला प्रकार चुकीचा : खा. चिखलीकर
कोरोना विषाणूंचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जिल्हा बँकेच्या परीसरात शांतता झोन म्हणून घोषित केले असताना पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत निवडीनंतर जो जेल्लोष कार्यकर्ते यांनी केला हे चुकीचे कृत्य आहे. जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य केली आहे . सत्ता मिळाली म्हणून असा उतावीळ पना बरोबर नाही नियमांचे उल्लंघन सत्ताधारी करीत आहेत अशी टीका खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली.

रेमडेसिवीर स्वस्त – केंद्र सरकारचा मोठा निर्णय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या