26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्हा परिषद सभेला निषेधाचे ग्रहण

नांदेड जिल्हा परिषद सभेला निषेधाचे ग्रहण

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोरोना संकट काळानंतर जिल्हा परिषदेची बुधवारी पहिलीच ऑफलाईन सर्वसाधारण सभा घेण्यात आली मात्र बांधकाम विभागाच्या विभाजनावरुन सदस्यांनी केलेल्या निषेधाने या सभेला ग्रहण लागले. यानंतर सभागृहातील एसी बंद असल्याने सदस्यांनी उखाडा होत असल्याच्या कारणावरुन गोंधळ घातला. यामुळे अखेर ही सभा तहकूब करावी लागली.

जवळपास दिड वर्षापासून कोरोना संकटाचा सर्वाना सामना करावा लागत आहे. दुस-या लाटेची तीव्रता जास्त होती यामुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आणि अन्य बैठकी ऑफलाईन घेण्याऐवजी ऑनलाईन घेण्यात आल्या. मात्र सध्या कोरोनाची लाट ओसल्यानंतर प्रदिर्घ कालावधीनंतर जिल्हा परिषदेची बुधवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी १ वाजता जि.प.ची ऑफलाईन स्पर्धा बोलावण्यात आली होती. या सभेस ६३ पैकी बहुतांशी सदस्य उपस्थित होते. काही दिवंगत मान्यवरांना श्रद्धाजंली अर्पण करुन सभेस सुरुवात करण्यात आली.

सभा सुरु होताच जि.प.च्या बांधकाम विभागाचे देगलूर व भोकर येथे विभाजन करण्यात आल्यामुळे अन्याय होईल यामुळे बांधकाम विभागाचे दोन्ही कार्यालय जिल्हा परिषदेच्या इमारतीत ठेवावेत अशी मागणी करत जि.प.सदस्य मनोहर शिंदे, साहेबराव धनगे, गंगाप्रसाद काकडे, चंद्रसेन पाटील, माणिक लोहगावे या सदस्यांनी बांधकाम विभागाच्या विभाजनाचा हातात बॅनर घेवून सभागृहात निषेध केला. यानंतर सभागृहातील एसी बंद असल्यामुळे सदस्यांना घामाघूम व्हावे लागले. प्रचंड उखाडा होत असल्याने अनेक सदस्यांनी सभागृहात पंख्याची व्यवस्था करावी यानंतर सभा घ्यावी अशी मागणी लावून धरली. परंतु जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, बांधकाम सभापती संजय बेळगे यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले. यामुळे सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. तेव्हा ही सर्वसाधारण सभा तहकूब करुन पुढील तीन दिवसात ही सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रारंभी कोरोनाच्या संसगार्मुळे निधन पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कोरोना मुक्त भोसी गाव केल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य प्रकाश भोसीकर यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्व पक्षीय सदस्यांनी घेतला. सभा सुरू असतांना शिक्षण सभापती संजय बेळगे हे एकटे नाष्टा करत असल्यावरून सदस्य यांनी आक्षेप घेतला.यावेळी मला शुगर आणि बीपी असल्याचे कारण बेळगे यांनी सदस्यांना दिले.मात्र या विषयावर अवांतर: चर्चा रंगत गेली.

बेगळे यांनी सदस्यांना अंगावर घेण्याचा प्रयत्न केला आणि सदस्य विरुद्ध बेगळे असे चित्र सभागृहात निर्माण झाले.त्यामुळे नाष्टा हा सभेत कळीचा मुद्दा ठरला. जोपर्यंत पंखे आणि एसी सभागृहात लागत नाही, तोपर्यंत सभा घेतली जाऊ नये,असा पवित्रा सदस्यांनी घेतला होता.तर सभा संपल्यानंतर शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा अधिकारी व इतर सहका‍-यांसोबत जात असताना , सदस्यांनी आता सभागृहात गोंधळ केला की त्यांचा निधी कापणार अशी धमकीवजा भाषा वापरली असा आरोप साहेबराव धनगे यांनी केला आहे.

हिरव्या बुरशीचा पहिला रुग्ण आढळला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या