कंधार: येथून जवळच असलेल्या फुलवळ येथील ८ व्यक्तींना बुधवार दि.१५ जुलै रोजी कंधार येथील शासकीय कोविड सेंटरमध्ये क्वॉरंटाईन करण्यात होते. रविवार दि.१९ जुलै रोजी त्यांचा कोरोना विषाणू हा वैद्यकीय अहवाल सकारात्मक आल्यामुळे फुलवळसह तालुक्यात खळबळ उडवून भितीचे वातावरण पसरले होते.
पण सुदैवाने त्या आठही व्यक्तींनी कोरोनावर मात केल्यामुळे वैद्यकीय तपासणी अंती रविवार दि.२६ जुलै रोजी रुग्णालयातून सुट्टी दिल्याने गावात आनंदाचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांच्यावतीने त्या ८ व्यक्तींचे पुष्पहार घालून ढोलताश्याच्या गजरात स्वागत करण्यात आले. सदरील गावात दैनंदिन कोरोना बाधितांची रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे गावात भितीचे वातावरण पसरले होते. शेजारील गावांचाही फुलवळकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केल्यामुळे भितीपोटी साधा भाजीपाला विक्रीसाठीसुद्धा या गावाकडे कोणी फिरकलेच नाही.
फुलवळ हे गजबजलेल्या वस्तीचे गाव आहे, परंतु या कोरोनाच्या संकटामुळे सर्व रस्ते बंद, सर्वत्र शुकशुकाट, मुख्य रस्याने कुंपन व गाव सामसूम झाल्यामुळे गाव जणू वाळीतच टाकल्यागत भासत होते. परंतु आज ५ महिला व ३ पुरुष अशा ८ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात करुन सुखरूप गावी परतल्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
त्या ८ व्यक्तींना पाहण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींचा व सर्व ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला. तर काहीजण आनंदाश्रूही ढाळत असल्याचे दिसून येत होते
Read More जि.प.शाळा बनली जुगाराचा अड्डा