24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeनांदेडदोन अल्पवयीन बालकांसह आठ चोरटे जेरबंद

दोन अल्पवयीन बालकांसह आठ चोरटे जेरबंद

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रतिनिधी
दुचाकीसह मोबाईल चोरी करणा-या दोन अल्पवयीन बालकांसह आठ चोरट्यांना पकडून जेरबंद करण्यात आले आहे. वजिराबाद गुन्हे शोध पथकाने केलेल्या या कारवाईत चोरीची एक दुचाकी आणि १७ मोबाईल, एक चांदीची चैन, एक खंजीर असा दोन लाख ६ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आली आहे. रेल्वेस्टेशन रस्त्यावर सदर चोरटे चोरलेल्या ऐवजाचा वाटा करतांना भांडत होते. त्यावेळी या चो-यांचा भांडाफोड झाला.

वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस अंमलदार गजानन किडे, विजयकुमार नंदे, मनोज परदेशी, व्यंकट गंगुलवार, शरदचंद्र चावरे, संतोष बेल्लुरोड, शेख इमरान, बालाजी कदम यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार दि. २९ एप्रिल रोजी त्यांनी रेल्वे स्थानक परिसरातील शेख अशफाक शेख रजाक रा.नुरी चौक नांदेड सुरज उर्फ सु-या शंकर सोनटक्के रा.कुंभारगल्ली चिखलवाडी नांदेड, शेख सोहेल शेख सत्तार रा.तेहरानगर कॉलनी नांदेड, शेख सोहेल शेख रजाक रा.देगलूरनाका नांदेड, चंद्रकांत प्रकाश नेरले रा.कुंभारगल्ली नांदेड, मदन केशव बटेवाड, रा.कोल्हा ता.मुदखेड आणि दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले. पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व चोरटे चोरी केलेल्या ऐवजाचा वाटा करतांना आपसात भांडत होते. त्यावेळी या चो-यांचा भांडाफोड झाला.

या चोरटयांकडून एका दुचाकीसह १७ चोरलेले मोबाईल असा एकूण २ लाख ६ हजार ३०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तर पोलीसांनी भाग्यनगर, अधार्पूर, मुदखेड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरलेल्या तीन दुचाकी चोरटयांनी सांगीतले. यातील दोन विधीसंघर्षग्रस्त या चोरट्यांनी केलेले उमरी येथील दोन दरोड्याचे गुन्हे, भाग्यनगर येथील दोन चोरीचे गुन्हे आणि मुदखेड व अधार्पूर येथील एक-एक चोरीचा गुन्हा असे गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्हेगारांना पुढील तपासासाठी पोलीस ठाणे अधार्पूर, भाग्यनगर व उमरी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या