26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeनांदेडवीजग्राहकांनी महावितरणचे ४८९ कोटी थकवले

वीजग्राहकांनी महावितरणचे ४८९ कोटी थकवले

एकमत ऑनलाईन

नांदेड : महावितरण आर्थिक अडचणीत असतानाही वीजग्राहकांना पुर्ण क्षमतेने वीजपुरवठा केला जात आहे. कोळसा टंचाईच्या पार्श्वभुमीवर महागडया दराने खुल्याबाजारातून वीजखरेदी करून अखंडीत वीजपुरठा केला जात आहे. मात्र लघुदाब वर्गवारीतील ५ लाख २४ हजार वीजग्राहकांनी ४८९ कोटी १६ लाख रूपये थकवल्याने दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता वाढली आह वीजग्राहकांनी वीजबिलांचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.

दिवसेंदिवस विजेची मागणी वाढतच चाललेली आहे अशा परिस्थितीतही महावितरण अखंडीत वीजपुरवठयासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. मात्र पुरवठा केलेल्या प्रत्येक युनिटचे पैसे वीजग्राहकांकडून दरमहा वसूल झालेच पाहिजेत अन्यथा वीज निर्मिती कंपन्यांना विकत घेतलेल्या विजेचे पैसे महावितरण देवू शकणार नाही. परिणामी अखंडीत वीजपुरवठा देणे शक्य होणार नाही. महावितरणच्या अस्तित्वासाठी वीजबील वसुली शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसल्याने थकबाकीवसुलीमध्ये हलगर्जीपणा करणा-या अधिकारी व कर्मचा-यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नुकताच औरंगाबाद येथे झालेल्या आढावा बैठकीत दिला आहे.

दिवाळी हा प्रकाशाचा सण म्हणून मोठया उत्साहाने साजरा करण्याची परंपरा आहे. मात्र मात्र नांदेड परिमंडळातील लघूदाब वर्गवारीतील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांची वाढत जाणारी थकबाकी ही चिंतेची बाब झाली आहे. थकलेली वीजबिलांची रक्कम त्वरीत न भरल्यास दिवाळी अंधारात साजरी करावी लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आज रोजी नांदेड परिमंडळातील लघूदाब वर्गवारीतील ५ लाख २४ हजार ३९८ घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे तब्बल ४८९ कोटी १६ लाख रूपयांची थकबाकी आहे. नांदेड परिमंडळातील ४ लाख ८९ हजार ४४५ घरगुती वीजग्राहकांकडे ४३२ कोटी ८२ लाख रूपयांची थकबाकी आहे. यामध्ये सर्वाधिक थकबाकी परभणी जिल्हयातील १ लाख ४२ हजार १८० ग्राहकांकडे ३२९ कोटी १८ लाख आहे.

त्याखालोखाल नांदेड जिल्हयातील २ लाख ५५ हजार ४४१ ग्राहकांकडे ६८ कोटी ५५ लाख रुपये आहे तर हिंगोली जिल्हयातील ९१ हजार ८२४ वीजग्राहकांकडे ३५ कोटी ९ लाख रूपयांची थकबाकी आहे. त्याचबरोबर नांदेड परिमंडळातील २७ हजार ४२६ व्यावसायिक लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांकडे १७ कोटी १६ लाख रूपयांची थकबाकी आहे. यामध्ये परभणी जिल्हयातील ८१९0 ग्राहकांकडे ८ कोटी ३८ लाख रुपए, नांदेड जिल्हयातील १७ हजार २५0 ग्राहकांकडे ७ कोटी ६0 लाख रुपए तर हिंगोली जिल्हयातील २ हजार ९८६ वीजग्राहकांकडे १ कोटी १८ लाख रूपयांची थकबाकी आहे.

औद्योगिक ग्राहकांकडेही मोठयाप्रमाणावर थकबाकी असून, नांदेड परिमंडळातील ६ हजार ५२७ ग्राहकांकडे ३९ कोटी १९ लाख रूपयांची थकबाकी आहे. यात परभणी जिल्हयातील २ हजार १४0 ग्राहकांकडे १२ कोटी ६७ लाख रुपए, नांदेड जिल्हयातील ३ हजार २७६ ग्राहकांकडे २0 कोटी ६४ लाख रुपए तर हिंगोली जिल्हयातील १ हजार १११ वीजग्राहकांकडे ५ कोटी ८९ लाख रूपयांची थकबाकी आहे. महावितरणची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता थकबाकी वसुलीशिवाय पर्याय उरलेला नाही. वाढत जाणारी विजेची मागणी व वाढत जाणारी थकबाकी यात समतोल साधून अखंडीत वीजपुरवठा करणे ही तारेवरची कसरत झालेली आहे. अशा खडतर परिस्थितीत थकबाकीदार वीजग्राहकांनी आपली सामाजिक जबाबदारी समजून वीजबिलांचा त्वरीत भरणा करावा असे आवाहन नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या