31 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home नांदेड सिंकदराबाद-मनमाड रेल्वे मार्गाचे लवकरच विद्युतीकरण

सिंकदराबाद-मनमाड रेल्वे मार्गाचे लवकरच विद्युतीकरण

एकमत ऑनलाईन

नांदेड: सिंकदराबाद ते मनमाड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाला मंजूरी मिळाली असुन येत्या दोन वर्षात या मार्गावरील सर्व रेल्वे विजेवर धावणार आहेत त्यामुळे सिकंदराबाद – मनमाड मार्गावरील प्रवास अधिक जलद होणार आहे. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे या महत्वकांक्षी प्रकल्पाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.

सिंकदराबाद ते मनमाड या रेल्वे मार्गावरील रेल्वे सध्या डिझेलवर धावतात. मनमाड येथून पुढे धावणा-या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आल्याने त्या भागातील रेल्वे प्रवास अधिक सुकर होतो. परंतु सिंकदराबाद ते मनमाड या मार्गाच्या विद्युती करणाचे काम सुरुच झाले नव्हते. शिवाय या मार्गाच्या दुहेरी करणाचे काम जलद गतीने होत आहे. त्यामुळे आता या मार्गाच्या विद्युतीकरणासाठी नांदेड जिल्हयाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नांदेड लोकसभा मदतार संघात निवडूण आल्यानंतर आवघ्या एका महिन्यातच पाठपुरावा सुरु केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या या मागणीकडे लक्ष देत विद्युतीकरणाच्या कामाला दि.१५ जून २०१९ रोजी मंजूरी दिली. तर याच काळात नांदेड ते बिदर या नविन रेल्वे मागार्लाही मंजूरी देवून पिंक बुकमध्ये तरतुद केली होती. प्रताराव पाटील चिखलीकर यांनी खासदार म्हणुन निवडूण आल्यानंतर नांदेडसह मराठवाडयातील रेल्वेचे प्रश्न हाती घेतले आहेत. सिंकदराबाद ते मनमाड रेल्वे लोहमार्गाच्या विद्युतीकरणासाठी मंजूरी मिळाली मात्र कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यापुर्वीच देशात कोरोनाचा प्रार्दूरभाव वाढल्याने टाळेबंदी करण्यात आली होती.

रिटर्न

टाळेबंदी उठल्यानंतर सिकंदराबाद ते नांदेड लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम सुरु करण्यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पुन्हा केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठपुरावा सुरु केला. त्यानंतर दि.२२ डिसेंबर २०२० रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी संबंधीत प्रशासनाला पत्र पाठवून काम जलद गतीने सुरु करण्याच्या अनुषंगाने निदेर्शीत केले होते.

यानुसार केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सिंकदराबाद ते मनमाड लोहमार्गाच्या विद्युतीकरणासाठी आवश्यक असणारा निधी महापारेषणकडे वर्ग केला आहे. सिकंदराबाद ते मनमाड या मार्गावरील महापारेषणच्या कार्यालयाकडे हा निधी जमा करण्यात आला असुन रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मेडचेल ते मुदखेड आणि मुदखेड ते मनमाड अशा दोन विभागात आणि दोन टप्यात लोहामार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

सिकंदराबाद ते मनमाड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम येत्या दोन वर्षात पुर्ण होण्याची आपेक्षा आहे. मार्च २०२० मध्ये कामाची वर्क आर्डर देण्यात आली होती परंतु कोरोना काळातील ताळेबंदीमुळे काम रखडले होते. आता लोहमार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाला गतीने सुरुवात करण्यात आली आहे. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सततच्या प्रयत्नामुळे आणि पाठपुराव्यामुळे मराठवाडयातील रेल्वेचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. अत्यंत महत्वपुर्ण असणा-या सिंकदराबाद ते मनमाड लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचा प्रश्नही खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नातुन आणि पाठपुराव्यातुन आखेर मार्गी लागला आहे. सिंकदराबाद ते मनमाड लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम जलदगतीने पुर्ण करुन घेण्याच्या अनुषंगाने रेल्वे प्रशासन,महापारेषण आणि संबंधीत विभागांसी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी संपर्क सुरु ठेवला असुन या मार्गावरील काम लवकरात लवकर पुर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे सिंकदराबाद – मनमाड हा प्रवास लवकरच अधिक सुकर होणार आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,414FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या