हिमायतनगर : शहरात मागील पंचवार्षिक योजनेत नव्याने अस्तित्वात आलेल्या नगरपंचायत परिसरात दोन नवीन पोलीस चौक्या उभारून येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कडे नांदेड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सरदार खान खालील खान पठाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील पतंगे यांनी त्यांची भेट घेऊन मागणी केली
हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी दक्षिण भारतामध्ये प्रसिद्ध असलेले श्री परमेश्वर मंदिर देवस्थान आहे या शहराच्या दक्षिण दिशेला तेलंगणा राज्याची सीमा असून उत्तर दिशेला विदर्भ आहे या शहरातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते त्याकरिता हिमायतनगर शहरातील दोन ठिकाणी वेगवेगळ्या पोलिस चौक्या उभारण्यात याव्या जेणेकरून शहरात येणा-या जाणा-या वाहनांची चौकशी होईल व शहरांमध्ये आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे खून दरोडे झाले नव्हते परंतु मागील एका वर्षाच्या कालावधीमध्ये ते खूप वाढले आहेत
तालुक्यांमध्ये मागील 1 वर्षात 5 ते 6 खून ,चो-यांचे प्रमाण, अनेक ठिकाणी मोठमोठे दरोडे सुद्धा पडल्याने तालुक्यातील महिलां सुद्धा सुरक्षित नाहीत त्यामुळे येणा-या काळात येथील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनां पोलिसांची भीती निर्माण झाली पाहिजे ह्या साठी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हिमायतनगर तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न येणा-या काळात निर्माण होऊ नये म्हणून शहरात दोन ठिकाणी नवीन पोलीस चौक्या उभारून द्याव्या अशी मागणी नांदेड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सरदार खान खलील खान पठाण ,तालुका अध्यक्ष सुनील पतंगे सह उदय देशपांडे यांनी गृहमंर्त्यांची भेट घेऊन केली आहे