34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeनांदेडअखेर नायगावात दारूची बाटली झाली आडवी

अखेर नायगावात दारूची बाटली झाली आडवी

एकमत ऑनलाईन

धर्माबाद (माधव हानमंते) : आ राजेश पवार यांच्या समर्थकाची धमार्बाद तालुक्यातील नायगाव (ध) येथील देशी दारू दुकान असून सदरील देशी दारूच्या आहारी गावातील गोर गरीब नागरीक व कामगार गेल्यामुळे त्यांच्या संसाराची राखरांगोळी होत असून शाळकरी मुलेही सदरील देशी दारूच्या आहारी गेल्याचे उघडकीस आल्यामुळे दैनिक एकमतमधून दारू दुकानविषयी महिलांच्या मागण्यांची दखल घेतली होती. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने कारवाई सुरू केली. गावातील महीलांनी देशी दारू दुकान हटविल्याशिवाय शांत बसणार नाही.असा संकल्प करून गेल्या अनेक महिन्यांपासून सदरील देशी दारू दुकान हटविण्यासाठी लोकशाही मागार्ने अनेक आंदोलन केल्यामुळे शेवटी महीलांच्या एकजूटीचा विजय झाला आहे.

शुक्रवारी घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत ३७४ महीलांनी सदरील देशी दारू दुकान बंद झालीच पाहिजे,असे हात वर करून मतदान केल्यामुळे अखेर नायगाव येथील देशी दारू दुकान बंद होणार असल्याचे सिद्ध झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, धमार्बाद तालुक्यातील नायगाव (ध) येथील देशी दारू दुकान गावातील मंदिर व शाळेच्या परीसरात असल्यामुळे सदरील देशी दारू दुकानावर सकाळपासूनच तळीरामाची गर्दी होत असून नेहमी लहान मोठ्या भांडणे होत असल्यामुळे याचा त्रास शाळकरी मुला, मुलींना, भाविकांना तसेच शेतात ये-जा करणा-्या महीलांना होत होता. तसेच गावातील पुरूष व शाळकरी मुले सदरील देशी दारूच्या आहारी गेल्यामुळे दररोज त्यांच्या घरात तंटे व्हाचे.व घरातील भांडे व साहित्य विक्री करून काही तळीराम आपली तलप पूर्ण करायाचे.परंतु घरातील पुरूषासोबत मुलेही दारूच्या आहारी गेल्यामुळे गावातील महीलांनी सदरील दारू दुकान बंद केल्याशिवाय आता पर्याय नाही.असा संकल्प करून गावातील महीलांनी दारू दुकान बंद करण्यासाठी लोकशाही मागार्ने अनेक आंदोलन व उपोषण केले आहेत.

परंतु एवढे सर्व गावातील महीलांनी देशी दारू दुकान बंद करण्याची मागणी करीत असल्याचे पाहूनही देशी दारू दुकानदार माझी देशी दारू दुकान बंद होणार नाही.असे विश्वासाने गावातील आपल्या समर्थकास सांगत होता.परंतु शेवटी गावातील महीलांच्या एकजूटीपुढे आमदार राजेश पवार समर्थक असलेला देशी दारू दुकानदारचे गवार्चे घर खाली झाले असल्याची चर्चा तालुक्यातील जनतेत होत आहे.

सदरील देशी दारूचे दुकान सुरळीत चालावे,यासाठी सदरील दुकानदार धनशक्तीच्या जोरावर अनेक प्रयत्न केले आहेत.परंतु गावातील एकजूट झालेल्या महीलांच्या आक्रोश पाहून सदरील देशी दारू दुकान बंद होणाराच असे चित्र शुक्रवारी घेण्यात आलेल्या ग्रामसभेच्या वेळी पाहण्यास मिळाले आहे.यावेळी सुचक सुनिता संजय राजपोड यांनी दारू बंदीचा ठराव मांडला.तर लक्ष्मीबाई सुर्यकार यांनी अनुमोदन दिले.यावेळी तहसिलदार यांचे प्रतिनिधी यु.डब्लू आडे, विस्तार अधिकारी आर.डी.जाधव , पोलिस उपनिरीक्षक गणेश कराड,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक पी.बी.टकले, ग्रामसेवक जैस्वाल,आकांडे उपस्थित होते.गावात एकूण ६३२ महीलांची संख्या आहे. दारु दुकान बंद करण्यासाठी ३७४ महीलांच्या स्वाक्ष-्या हिन कॉमेरा समोर झाल्या आहेत. सदरील देशी दारू दुकान येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा रूग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश गौड यांच्या आईच्या नावाने आहे.

हळदीला आली सोन्याची झळाळी ;पंधरा हजाराचा मिळाला दर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या