36.1 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeनांदेडअखेर ‘त्या’ घोडेस्वार अधिका-याची माघार

अखेर ‘त्या’ घोडेस्वार अधिका-याची माघार

एकमत ऑनलाईन

नांदेड : शासकीय कार्यालयात वाहना ऐवजी घोड्यावर बसुन कार्यालयात येण्याची आणि तो घोडा जिल्हाधिकारी कार्यालयात बांधण्याची परवानगी द्यावी मागणी जिल्हाधिका-याकडे एका अधिका-याने केली होती.यावर नेटक-यांनी घेतलेले तोंडसुख आणि प्राप्त झालेला वैद्यकीय अहवाल या सर्व घडामोडीनंतर या घोडेस्वार अधिका-याने या मागणीतून माघार घेतली आहे.यामुळे टांगा पलटी अन् घोडे झाले फरार अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना विभागात सहाय्यक लेखाधिकारी असलेल्या सतीश पंजाबराव देशमुख यांनी बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना दिलेल्या पत्रात अजब मागणी केली होती.यात, मला पाठीच्या कण्याचा त्रास होत असल्यामुळे दुचाकी वाहनाने कार्यालयात येण्यास मला त्रास होत आहे. त्यामुळे मी घोडा खरेदी करायचे ठरवले आहे. तेव्हा घोड्यावर बसून कार्यालयात विहित वेळेत येणे मला शक्य होईल.यासाठी मी घोडा खरेदी करण्याचे ठरविले आहे.हा घोडा आणल्यास त्याला बांधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधण्यासाठी परवानगी देण्यात यावी,अशी विनंती वजा मागणी केली होती.

सदर पत्र सोशल मिडीयावर व्हायरल होताच या अजब मागणीमुळे नांदेड शहर मराठवाड्यात चर्चेत आले होते. तर प्रशासनही या मागणीमुळे बुचकळ्यात पडले होते. तर सोशल मिडीयातून नेटक-यांनी अनेक चौकशा करित चांगलेच तोंडसुख घेतले.अखेर जिल्हाधिकारी कार्यालयात घोडा बांधण्याची परवानगीचा अर्जाबाबत निवासी उपजिल्हाधिका-यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना पत्र पाठवून अहवाल मागविला होता.अधिष्ठातांनी जिल्हाधिका-यांना यावर उत्तर देताच घोडा बांधण्याची परवानगी मागितल्याचा अर्ज या घोडेस्वार अधिका-याने मागे घेतल्याचे दुसरे पत्र दिले आहे.यामुळे टांगा पलटी अन् घोडे झाले फरार अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

कत्तलीसाठी जाणारी जनावरे पोलिसांनी पकडली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
167FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या