23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeनांदेडपर्यावरणाच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढे यावे ; प्रणिता ताई देवरे चिखलीकर

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढे यावे ; प्रणिता ताई देवरे चिखलीकर

एकमत ऑनलाईन

कंधार : शहरातील उद्यानाची खूपच दुरावस्था झाली असून पालिका प्रशासनाने विशेष लक्ष देऊन या उद्यानाची देखभाल व दुरुस्तीसाठी उपाययोजना करावी असे भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी उद्यान परिसरात स्वच्छता अभियान व वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविताना बोलत होते.

शांतीदुत गोविंदराव पाटील चिखलीकर उद्यान तथा हुतात्मा स्मारकात भाजप महिला मोर्चाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा वाडदिवस साजरा करण्यात आला.

पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी सर्वांनी पुढे येऊन सेवा कार्य म्हणून दर रविवारी हुतात्मा स्मारक येथे आपण केलेल्या वृक्षारोपणाचे संवर्धन व्हावे यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावा आणि आपण लावलेल्या रोपाची काळजी घ्यावी.

शहराची शोभा वाढवावी पालिका प्रशासन हे काम करेलच पण भाजपच्या कार्यकर्त्यांनी उद्यानाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतलेले आहे ते काम पूर्ण होईपर्यंत आपण स्वस्थ बसू नये असे आवाहन केले आणि पुन्हा एकदा हे उद्यान नागरिकांसाठी सुसज्ज करून देणार असल्याचा निराधार व्यक्त केला.

यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशउपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताई देवरे चिखलीकर ,महिला मोर्चाचे जिल्हाध्यक्षा चित्ररेखा गोरे ,भाजपाचे शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार ,महिला मोर्चाच्या तालुक्याच्या सरचिटणीस कल्पना गीते ,महिला

मोर्चाच्या ओबीसी च्या तालुकाध्यक्षा सुनंदा वणजे, अनुसूचित जाती आघाडीच्या अध्यक्षा वंदना डुमणे, कविता गोरे, शहर सरचिटणीस मधुकर डांगे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष साईनाथ कोळगिरे, कैलास नवघरे,
शिक्षक आघाडीचे तालुका अध्यक्ष राजहंस शहापुरे, सोशल मीडिया चे रजत शहापुरे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर, आसिफ शेख ,अविनाश गीते ,व्यंकट नागलवाड,दिपक गोरे,माधव वाकोरे, यांची उपस्थिती होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या