26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeनांदेडसर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे - खा.संभाजी राजे

सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे – खा.संभाजी राजे

एकमत ऑनलाईन

नांदेड : मागील अनेक वषार्पासून महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षण मागणीचा लढा सातत्याने चालू आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला १३ टक्के शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देन्याचे धोरण स्विकारले मात्र काहींनी आरक्षणाच्या विरोधात कोर्टात याचिका दखल केली. मात्र सर्व समाजाला समान न्याय मिळाला पाहीजे, असे प्रतिपादन खा.संभाजी राजे यांनी केले.

स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने आयोजित केलेल्या एल्गार मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आ. नरेंद्र पाटील हे होते. पुढे बोलातांना खा.संभाजी राजे म्हणाले की,मराठा समाजाचा सेवक म्हणून सरकारला आव्हान करतो की, महाराष्ट्रतील मराठा समाज हा सर्वात मोठा समाज आहे.या मराठा समाजाला सर्व समाजाप्रमाणे आरक्षण देवून न्याय मिळाला पाहिजे. यासाठी न्या. लढाईसाठी सरकारने अभ्यासू वकिलांची नियुक्ती करावी असे आव्हान केले.

या मेळाव्यास सुभाष जावळे, रमेश पाटील केरे, डॉ. संजय लाखे पाटील, विनायक भिसे पाटील, गंगाधर काळकुट्टे, सज्जन सोळंके, माधव देवसरकर , राजकुमार पा.सूर्यवंशी, छावाचे प्रदेश संघटक अप्पासाहेब कुडेकर, प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे , छावा क्रांतीवीर सघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे, कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीष जाधव, मराठा संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मनीष वडजे, प्रा.डॉ. गणेश शिंदे, छावाचे प्रदेश कार्याध्यक्ष इंजि. तानाजी हुस्सेकर, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा प्रा.डॉ. रेणुकाताई मोरे, डॉ. गजानन माने, छावा श्रमिक संघटनेचे विभागीय अध्यक्ष भास्कर हंबर्डे आदी मान्यवरांची उपस्थिती होते.

‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत शहरात १४७ कोरोनाबाधितांचा शोध

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या