19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeनांदेडसंपर्कात आलेल्या सर्वांनी स्वॅब तपासणी करावी : आ. राजूरकर यांचे आवाहन

संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वॅब तपासणी करावी : आ. राजूरकर यांचे आवाहन

एकमत ऑनलाईन

नांदेड: जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस आ. अमरनाथ राजूरकर उपस्थित होते. यावेळी संपर्क आलेल्या अधिकारी व निकटवतीर्यांनी स्वॅबची तपासणी करावी यासाठी त्यांनी भ्रमणध्वनी द्वारे जिल्हाधिकारी विपीन इटनकर, मनपा आयुक्त सुनिल लहाणे यांच्यासह आपल्या संपर्कात आलेल्या सर्व अधिकारी व निकटवतीर्यांशी संपर्क साधत स्वॅबची तपासणी करावी असे आवाहन केले आहे.

लॉकडाऊनच्या काळात सर्व सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी आग्रेसर असलेल्या आ. अमरनाथ राजूरकर यांना कोरोनाची बाधा झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. नांदेडच्या आशा हॉस्पीटल मध्ये प्राथमिक उपचारानंतर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सूचनेनंतर पुढील उपचारासाठी मुंबईच्या भाटीया रुग्णालयात आ. राजूरकर दाखल झाले आहेत.

आ. राजूरकर यांची प्रकृती ठणठणीत असुन पालकमंत्री आशोकराव चव्हाण,काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी आ. अमिताताई चव्हाण, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, खा. हेमंत पाटील, आ. रावसाहेब आंतापुरकर, आ. मोहन हंबर्डे, आ. बालाजी कल्याणकर याच्यासह राज्यातील मंत्री, खासदार, आमदार व विविध राजकीय पक्षातील नेते व पदाधिकार्‍यांनी आ. अमरनाथ राजूरकर यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून प्रकृतीची अस्थेवाईक पणे चौकशी करुन लवकरच कोरोनावर मात करण्यासाठी सदिच्छा व्यक्त केली.

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,आयुक्त डॉ.सुनील लहाने,सीईओ शरद कुलकर्णी,पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांचे अत्यंत चागले काम सुरू आहे.त्यांच्या कामाला गती यावी व सुरेक्षेच्या दृष्टीने आपल्या संपर्कात आलेल्या अधिकारी व निकटवतीर्यांनी स्वॅबची तपासणी करावी यासाठी रुग्णालयात उपचार घेत असतांनाही आ. अमरनाथ राजूकर यांनी संबंधीतांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून आवाहन केले आहे.

Read More  नांदेड शहरात पावसाची जोरदार हजेरी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या